“आदिवासी उलगुलान जनजागरण” करण्यासाठी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र पुढे सरसावली
आदिवासी क्रांतिकार रॉबिनहूड तंट्यामामा भिल्ल यांची जयंती केली साजरी
पुणे/ प्रतिनिधी :
आदिवासी सेवा संघ, पुणे जिल्हाच्या वतीने आदिवासी क्रांतिकार रॉबिनहूड तंट्यामामा भिल्ल यांची जयंती तसेच 26 जानेवारी 2022 भारतीय प्रजासत्ताक दिन घेरापुरंदर येथे साजरा करण्यात आले.
आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने सह्याद्रीच्या डोंगर भागातील पुरंदर-भोर-वेल्हा- तालुक्यासाठी आदिवासी सेवा संघ आदिवासी विचारधारेच्या संघटनेच्या वतीने “आदिवासी उलगुलान जनजागरण” करण्यासाठी पुणे जिल्हाध्यक्ष मा. आदिवासी अनिल तिटकारे साहेब व आदिवासी सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आदिवासी म्हणजे कोण? त्याचे अस्तित्व? त्यांचा इतिहास- वर्तमानकाळ आणि भविष्य, आदिवासी संस्कृती- परंपरा-देवदेवता, आदिवासींचे पाचवी अनुसूची आणि कलम 342 आणि त्यांचे संविधानिक न्याय-अधिकार, यावर सविस्तर मार्गदर्शन आणि वैचारिक चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदिवासी सेवा संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अनिलजी तिटकारे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अविनाशजी मुंढे, आदिवासी सेवा संघ, पुणे जिल्हाचे पदाधिकारी रोहित उतळे, अनिलजी साळुंखे, विजयजी गंभीरे, मधुकर सातपुते, पंकज चपटे, सुनिल साबळे, गणेश जढर, लक्ष्मण गायकवाड, सुनिल वेगरे, दगडू हिलम, सायबू मुकणे, शरद सनस पवार तसेच आदिवासी पारधी परिवर्तन आघाडी श्याम माने, गणेश मिसाळ, निखिल केळगणे, अक्षय शिंदे, रोहिदास कोंडके, संतोष चिव्हे, राहुल रांजणे, चंद्रकांत मिरकुटे आदी. उपस्थित होते.