कोंबडभुजे येथे नवी मुंबई विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांचा मेळावा संपन्न.
उरण/प्रतिनिधी :
श्री नांदाई माता चार गाव पुनर्वसन समिती, जय हनुमान कराडी कोळी मच्छीमार संघटना वाघिवलि, अखिल भारतीय किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांचा जाहिर मेळावा रविवार (दि. 25) रोजी नांदाई माता मंदिर जवळ, कोंबडभुजे येथे मोठ्या उत्साहात, उत्तम प्रतिसादासह संपन्न झाला.
प्रत्येक व्यक्तीला आवश्यक ते प्रशिक्षण देऊन कायमस्वरूपी रोजगाराची लेखी हमीपत्र दिले पाहिजे, आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित कुटुंबातील विद्यार्थी, विद्यार्थिनींना (पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण पर्यंत) संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी सिडकोने उचलावी, मौजे वाघिवलि गावाचे साडे बारा टक्केचे भूखंड जमीन कसना-यांनाच मिळाली पाहिजे, सर्व विमानतळ बाधित गावांना 22.5% (साडे बाविस टक्के) योजना लागू करावी, मच्छीमार बांधवांच्या योग्य पुनर्वसनासाठी 2013 च्या कायद्या नुसार नुकसान भरपाई व इतर मागण्यांची पूर्तता करावी, घर बांधनी साठी वाढ़ीव अनुदान द्यावे, घरभाडे भत्ता मार्केट रेट प्रमाणे द्यावे, शून्य पात्रता ही पद्धत बंद करून प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्येक बांधकामास तिप्पट क्षेत्र व नुकसान भरपाईचा लाभ द्यावा, नव्याने निर्माण केलेल्या शाळामध्ये सर्व मूलभूत भौतिक सुविधा त्वरित उपलब्ध करून द्यावा, घर बांधकामासाठी आर्किटेक्चरची नियुक्ति सिडकोने करावी, सर्व प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामाच्या सी. सी. चे तातडीने वाटप करावे, स्वतंत्र कुटुंबाची गणना करावी, प्रत्येक व्यक्तीला स्वंतंत्र प्रकल्पग्रस्ताचा दाखला द्यावा, स्मशानभूमी गावाजवळ असावी, सार्वजनिक व खाजगी मंदिराचे पुनर्वसन करावे आदि विविध मागण्यांसाठी कोंबडभुजे येथे प्रकल्पग्रस्तांचा जाहिर मेळावा भरविण्यात आला होता.
या मेळाव्याचे अध्यक्ष पुंडलिक म्हात्रे, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, संजय ठाकुर, जनवादी महिला संघटनेच्या हेमलता पाटिल,नांदाई माता चार गाव कमिटीचे अध्यक्ष ॲड. प्रशांत भोईर, शिवक्रांती मावळा रायगडचे अध्यक्ष किरण केणी, वाघिवलि गावचे सरपंच अनिल पाटिल, वाघिवलि गाव अध्यक्ष विकास पाटिल, युवा नेते अजित म्हात्रे, साई संस्थान वहाळचे अध्यक्ष रविशेठ पाटिल, ॲड. निग्रेश पाटिल, सुधाकर कोळी, अविधा मढवी, कीर्ति मढवी, कामगार नेते भूषण पाटिल, जयवंत पाटिल, संतोष ठाकुर, आगरी कोळी यूथ फॉउंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटिल, 95 गाव कृती समितीचे सदस्य दीपक पाटिल, पुंडलिक भगत, विशाल पाटिल, तृप्ती भोईर, अंकुश भगत आदि मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी 2500 हुन अधिक ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्त यावेळी उपस्थित होते. त्याच्यात महीलांचा सहभागही लक्षणीय होता. सदर मेळाव्याचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संजय ठाकुर तर आभार प्रदर्शन जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटिल यांनी केले. सिडकोने येथील प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात या हेतुने सर्व विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्त एकवटलेले दिसून आले.