Screenshot 2019 08 27 17 37 44 751 Com.android.chrome
उरण ताज्या पनवेल महाराष्ट्र राजकीय रायगड

महेश बालदी यांना कोणतीही ताकद पराभूत करू शकणार नाही : आमदार प्रविण दरेकर ———————————— उरण मतदार संघात युती होवो किंवा ना होवो, मिळेल ती निशाणी घेऊन पुढे जाण्याचा भाजप नेते महेश बालदी यांचा निर्धार ————————–

  • महेश बालदी यांना कोणतीही ताकद पराभूत करू शकणार नाही : आमदार प्रविण दरेकर
  • आ. प्रशांत ठाकूर यांना सिडकोचे अध्यक्ष आणि महेश बालदी यांना मंत्री बनवायचे आहे – लोकनेते रामशेठ ठाकूर
  • उरण मतदार संघात युती होवो किंवा ना होवो, मिळेल ती निशाणी घेऊन पुढे जाण्याचा भाजप नेते महेश बालदी यांचा निर्धार

——————————————————-
आ. प्रशांत ठाकूर यांना सिडकोचे अध्यक्ष आणि महेश बालदी यांना मंत्री बनवायचे आहे त्याची मुहूर्त मेढ आज रोवल्याचे सांगून लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकुर यांनी भाजप सबका साथ , सबका विकास म्हणत असताना इतर पक्ष लहान सहान विचार करीत असल्याचे आपल्याला दिसतात. त्यामुळेच आपण  सगळ्यांना बरोबर घेऊन विकास करणार्‍या पक्षा बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक आमदार आपला कार्य अहवाल सादर करीत नाहीत असे असताना महेश बालदी यांनी कार्याहवाल सादर केला हे महत्वाचे आहे. ज्यांना विकास करावयाचा आहे त्यांना भाजप शिवाय पर्याय नाही.
———————————————————-

पनवेल/ प्रतिनिधी :
जातीपातीचे राजकारण न करता उरणाचा विकास करणार्‍या महेश बालदी यांना कोणतीही ताकद पराभूत करू शकणार नाही असा विश्वास रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आमदार प्रविण दरेकर यांनी रविवारी पनवेल यथे झालेल्या भारतीय जनता पार्टी उरण विधानसभा बुथ कार्यकर्ता संमेलनात व्यक्त केला .
पुन्हा आणूया, आपले सरकार! या शीर्षकाखाली भाजप उरण विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन रविवारी खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर झाले. या संमेलनास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम, जेएनपीटीचे विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, खालापूर तालुकाध्यक्ष बापू घारे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, रामदास ठोंबरे, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, पनवेल तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, पनवेल उरण विधानसभा विस्तारक अविनाश कोळी उपस्थित होते.
यावेळी काश्मीरचे 370 कलम रद्द करून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न पूर्ण केल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानणारा ठराव मांडून रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आमदार प्रविण दरेकर यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. महेश बालदी यांनी उरण मतदार संघात आमदार , खासदार यांना लाजवेल एवढा विकास केला आहे याची साक्ष या मेळाव्याला जमलेल्या गर्दीमुळे आपल्याला मिळत आहे.  उरणमध्ये आपल्याला  वातावरण चांगले आहे जनतेचा आपल्यावर विश्वास निर्माण झाला आहे हा विश्वास  वाढवण्याचे काम करण्यासाठी बूथ कार्यकर्त्यांनी पोष्ट्मनची भूमिका व्यवस्थित केल्यास जातीपातीचे राजकारण न करता उरणाचा विकास करणार्‍या महेश बालदी यांना कोणतीही ताकद पराभूत करू शकणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार प्रशांत ठाकुर यांनी महेश बालदी हा लढवय्या कार्यकर्ता आहे. त्याच्यासाठी आपल्याला उरण मध्ये एक लाखाचा टप्पा पार करावयाचा असल्याचे सांगून आपण कॉंग्रेस पक्षातून भाजप मध्ये त्यांच्या सांगण्यावरूनच आलो कारण कॉंग्रेस पक्षात दिलेला शब्द पाळला जात नव्हता. भाजप हा दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे. उरण मध्ये संघर्षाला विकासाची जोड द्यावी लागते. महेश बालदी हे विकासासाठी झपाटलेले नेतृत्व आहे. त्यांचा पाठीशी उभे रहा. त्यासाठी सज्जा व्हा, असे आव्हान त्यांनी केले.
उरण मतदार संघात युती होवो किंवा ना होवो मिळेल ती निशाणी घेऊन पुढे जाण्याचा निर्धार भाजप नेते महेश बालदी यांनी बूथ कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त करताना मी मारवाडी असल्याची टीका करता मग हिम्मत असेल तर मराठीवर, मराठी साहित्यावर आपण चर्चा करू या असे आव्हान त्यांनी विरोधकांना यावेळी दिले. या मतदार संघात मी बोललो ते केले पण फलक लावले नाहीत असा टोला त्यांनी उरणच्या विद्यमान आमदारांना लावला. काम करण्यासाठी निवडून देतात. येथे जातीचा प्रश्न नसतो मानवतावाद आणि विकास हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 56 = 59