Img 20220922 Wa0048
अलिबाग ताज्या पनवेल रायगड सामाजिक

कोलवाडी येथे साठणाऱ्या पावसाच्या पाण्याची जागृती फाउंडेशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

कोलवाडी येथे साठणाऱ्या पावसाच्या पाण्याची जागृती फाउंडेशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल तालुक्यातील पालेबुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील कोलवाडी गावातील नेसर्गिक नाले, गटारे पाण्याचा निचरा होणारे मार्ग बंद केल्याने गावात पावसाचे पाणी वारंवार साचते, गुडघाभर पाणी साचत असल्याने विध्यार्थी नागरिकांना या पाण्यातून मार्ग काढत जावे लागते या साठणाऱ्या पाण्याविषयी उपाययोजना करणायची मागणी जागृती फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे यांनी रायगड जिल्हाधिकारी यांचे कडे केली आहे .
IMG-20220922-WA0044पनवेल तालुक्यातील पालेबुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील कोलवाडी गावात अनेक व्यावसायिकांनी नेसर्गिक नाले, गटारे पाण्याचा निचरा होणारे मार्ग बंद केल्याने गावात गेली काही वर्षे जरा तरी पाऊस पडला कि पाणी साचून गावातील नागरिकांच्या घरात जाते तर रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत असल्याने येण्या जाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होत आहे वाहतूक खंडित होते जेष्ठ नागरिक, विद्यार्थी याना येणे जाणे जिकरीचे झाले आहे .सतत पाऊस सुरु राहिल्यास पाण्या चा निचरा न झाल्याने कोलवाडी गावातून पाणी पडघे बौद्धवाडीत शिरते त्यामुळे तेथील नागरिकांना हि या समस्येला समोरे जावे लागत आहे. याविषयी जागृती फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे यांनी रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, ग्राम पंचायत पालखुर्द ग्रामपंचायत यांच्याकडे केली आहे .

adivasi logo new 21 ok (1)