IMG-20201101-WA0019
कर्जत ताज्या सामाजिक

हेल्पींग हॅड सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

हेल्पींग हॅड सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

कर्जत/ मोतीराम पादिर :
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाहुचीवाडीचे मुख्याध्यापक वसावे, उपशिक्षक हिलग, गावचे सुपुत्र शिक्षक वसंत ढोले यांनी भागुचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक हरिचंद्र आढारी यांच्याकडे वेळोवेळी संस्थेच्या माध्यमातून शाळेला शैक्षणिक साहित्य मदतीसाठी चर्चा करून आज दि.०१/११/२०२० रोजी भागुचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक हरिचंद्र आढारी आणि गिरेवाडी शाळेचे उपशिक्षक वसंत ढोले यांच्या माध्यमातून हेल्पींग हॅड सामाजिक संस्था कल्याण या संस्थेने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाहुचीवाडी येथील इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी हेल्पींग हॅड सामाजिक संस्थेचे मा.सचिन राऊत, तुषार दांडे, संकेत गाडेकर, संदिप नलावडे, ग्रामपंचायत सदस्या निलम ढोले, शाळेचे मुख्याध्यापक वसावे, वसंत ढोले, हरिचंद्र आढारी, व्यवस्थापन समिती अध्यक्षा कमल बांगारे, सदस्य बुधाजी ढोले, मनोहर शेंडे, जयश्री ढोले, गुलाब ढोले, संजना निरगुडा, कुंदा ढोले, जया ढोले, रंजना पारधी, सुशिला मेंगाळ, काशिनाथ बांगारे, महादू ढोले, पांडू ढोले, वामन ढोले आदि. ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

58 + = 67