समाज कल्याण तसेच महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा इच्छुकांनी लाभ घ्यावा
अलिबाग/ प्रतिनिधी :
रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण तसेच महिला व बाल कल्याण विभागांमार्फत सन 2022-2023 या वर्षाकरिता विविध योजना राबविण्यात येतात. इच्छुक व पात्र ग्रामीण भागातील महिला बचतगट, महिला भजनी मंडळ, पात्र मुली व महिलांना तसेच समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय बचतगटांनी संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी / बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत अर्ज सादर करण्याबाबत रायगड जिल्हा परिषदेमार्फत आवाहन करण्यात आले आहे.
योजनेचे नाव:-
1) महिला भजनी मंडळांना भजनाचे साहित्य पुरविणे, या योजनेकरिता पात्रता:- ग्रामीण भागातील भजनी मंडळ असावे, 2) महिला बचतगटांना पापड मशिन पुरविणे, 3) महिला बचतगटांना दळन मशिन पुरविणे, 4) महिला बचतगटांना टेबल, खुर्ची, लोखंडी कपाट पुरविणे, 5) महिला बचतगटांना सतरंजी पुरविणे, या योजनांकरिता पात्रता:- ग्रामीण भागातील महिला बचतगट असावा, 6) इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत शाळेत जाणाऱ्या मुलींना सायकल पुरविणे, 7) महिलांना साहित्य पुरविणे (शिलाई मशिन/पिको फॉल मशिन/ॲमरेडी मशिन (नक्षीकाम)) या योजनांकरिता पात्रता:- ग्रामीण भागातील मुलींना व महिलांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना, अर्ज कोणामार्फत सादर करावा:- बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख:- दि.15 ऑक्टोबर 2022.
योजनेचे नाव:- 1) मागासवर्गीय वस्तीत व वस्तीवर जाणाऱ्या सौर ऊर्जा प्रकार योजना 2) मागासवर्गीयांसाठी अनुदानित वसतिगृहांना सोयी सुविधा पुरविणे (सतरंजी व चादरी पुरविणे), 3) मागासवर्गीय वस्तीतील समाजमंदिरास खुर्ची पुरविणे, 4) मागासवर्गीयांना समाजमंदिरास सतरंजी पुरविणे, 5) मागासवर्गीयांच्या व्यायामशाळांना साहित्य पुरविणे, या योजनांकरिता पात्रता:- मागासवर्गीय वस्तींसाठी, अशी आहे, 6) सामूहिक व्यवसायासाठी मंडपाचे साहित्य पुरविणे या योजनेकरिता पात्रता:- मागासवर्गीय बचतगटांसाठी, 7) संगणक/शिलाई मशिन/ड्रायव्हींग/बांबू फर्निचर प्रशिक्षणासाठी सहाय्यक अनुदान, 8) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप पुरविणे, 9) मागासवर्गीय युवकांना वेल्डिंग कामासाठी मशिन पुरविणे, या योजनांकरिता पात्रता:- वैयक्तिक लाभाच्या योजना, अशी आहे. अर्ज कोणामार्फत सादर करावा:- पंचायत समिती गटविकास अधिकारी, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख:- दि.15 ऑक्टोबर 2022.
इच्छुकांनी या योजनांचा लाभ घेण्याकरिता दि.15 ऑक्टोबर 2022 पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) तथा जिल्हा परिषदेचे प्रभारी समाजकल्याण अधिकारी नितिन मंडलिक यांनी केले आहे.