कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालयाला शासनाकडून सेंटर ऑफ एक्सलन्स मंजूर
तलासरी / अरविंद बेंडगा :
महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान सहायता केंद्राच्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील पंचवीस महाविद्यालयांना सेंटर ऑफ एक्सलन्स साठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून आर्थिक सहाय्य मिळणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक ८ सप्टेंबर २०२३ रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील व उच्च व तंत्र शिक्षण प्रधान सचिव मा. विकासचंद्र रस्तोगी, महाराष्ट्र शासनाचे उच्च शिक्षण संचालक मा. शैलेश देऊळकर माहिती व तंत्रज्ञान सहायता केंद्राचे प्रमुख यशवंत शितोळे यांच्या उपस्थितीत राज्यातील २५ महाविद्यालयातील प्राचार्यांना प्रत्येकी एक लाख रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात आले.
हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था पुणे येथे संपन्न झाला. प्राचार्य डॉ. भगवानसिंग राजपूत प्रा.रितेश हटकर प्रा.भास्कर गोतीस श्री. जगदीश पाटील यांनी प्रमाणपत्र व १ लाखाचा धनादेश मंत्र्यांच्या हस्ते स्वीकारला. या निधीतून महाविद्यालयात विद्यार्थी हिताचे विविध उपक्रम राबवून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न महाविद्यालय करणार आहे.