Img 20230917 Wa0003
अलिबाग कोकण ठाणे ताज्या दिल्ली नवी मुंबई पनवेल पनवेल महाराष्ट्र मुंबई रायगड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार इर्शाळवाडीचे पुनर्वसन केलेल्या जागेची केली पाहणी..

Adivasi samrat logo new website

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार इर्शाळवाडीचे पुनर्वसन केलेल्या जागेची केली पाहणी..

सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी इर्शाळवाडी ग्रामस्थांबरोबर केली चर्चा..

खालापूर/ आदिवासी सम्राट :
इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. यावेळी बचाव कार्य करण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण शासकीय यंत्रणा लावली होती. त्याचबरोबर आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांचा देखील मोठा सहकार्य होता. अशावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः घटनस्थाळी दिवसभर थांबून बचाव कार्याचा आढावा घेत इर्शलवाडीच्या ग्रामस्थ्यांची विचारपूस करत होते. यावेळी इर्शलवाडीचे तात्काळ पुनर्वसन करण्यात येईल असे सांगितले होते. १० ते १२ दिवसात पुनर्वसनाची प्रक्रिया करत चौक, नाणिवली येथे कायमस्वरूपी जागा देण्यात आली.
IMG-20230917-WA0002आता, काही दिवसांनी इर्शाळवाडी पुनर्वसनाचे प्रत्यक्षात काम चालू करण्यात येणार असल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सिडकोच्या माध्यमातून इर्साळवाडीचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या पुनर्वसनाची पाहणी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या माध्यमातून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घेवून शनिवार, (दि. १६ सप्टें.) रोजी इर्शाळवाडी पुनर्वसनाची पाहणी करण्यात आली. ६ महिन्यांत घरे, रस्ते व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध देण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
IMG-20230917-WA0001

यावेळी प्रांत अधिकारी श्री.अजित नैराळे, तहसिलदार श्री.अयुब तांबोळी, ठाणे जिल्हाध्यक्ष जानू हिरवे, जिल्ह्यातील आदिवासी समाजाती प्रमुख कार्यकर्ते दत्तात्रेय हिंदोळे, सुनील पारधी, पत्रकार गणपत वारगडा, परशुराम दरवडा, जयवंत शीद, विष्णु खैर, अंकुश वाघ, गणेश पारधी, मंगळू पारधी, राजेंद्र पारधी त्याचबरोबर सिडको बांधकाम विभागाचे अधिकारी, दरडग्रस्त आदिवासी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

adivasi logo new 21 ok (1)