IMG-20230919-WA0001
कर्जत ठाणे नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुरबाड रायगड सामाजिक सुधागड- पाली

आदिवासी नोकरवर्ग ठाकर/ठाकूर समाज उत्कर्ष संस्था व जिगरी ग्रुप यांच्या संयुक्ताने मुरबाडमध्ये पार पडली बैठक

Adivasi samrat logo new website

आदिवासी नोकरवर्ग ठाकर/ठाकूर समाज उत्कर्ष संस्था व जिगरी ग्रुप यांच्या संयुक्ताने मुरबाडमध्ये पार पडली बैठक

UPSC, IAS, IFS, IPS अधिकारी बना आणि रू. ९९,९९९/- बक्षीस मिळवा ; विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी बैठकीत केली घोषणा

मुरबाड/ आदिवासी सम्राट :
बोगस आदिवासींचा शोध आणि त्यांच्याविरोधात न्यायालयीन लढा सातत्याने घेत असतांना आता आदिवासी नोकरदार ठाकर/ठाकूर समाज संस्थेने समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर भर देत आहे. रायगड, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद या सात जिल्हामध्ये आदिवासी ठाकर/ ठाकूर समाजाची मोठी लोकवस्ती आहे. या सात जिल्ह्यातून ठाकूर/ ठाकर समाजातील विद्यार्थी व विद्यार्थींनी UPSC, IAS, IPS, IFS अधिकारी बनवा असा प्रामाणिक उद्देश नोकरदार वर्ग यांचा आहे. आणि ते सातत्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आलेले आहेत.

IMG-20230919-WA0002मुरबाडमध्ये रविवार (दि. १७ सप्टें. २३) रोजी पार पडलेल्या आदिवासी नोकरदार ठाकर/ठाकूर समाज उत्कर्ष संस्था, महाराष्ट्र राज्य आणि जिगरी ग्रुपच्या बैठकीत नोकरदार वर्गाचे अध्यक्ष अरूण खाकर यांनी मिटींगचे उद्देश व संस्थेच्या कार्यबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मोरेश्वर भला यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की तरूणांनी जे कार्य हाती घेतले आहे ते समाजाची दिशा बदलणारे आहे अंधारातून प्रकाशाकडे नेणारे आहे माझ्या सारख्या जेष्ट व्यक्तीचा पांठिंबा या कार्याला सदैव राहणार आहे. जिगरी ग्रुप हा नावाप्रमाणेच जिगरबाज असून तरुणांनी या सभेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या बद्दल त्यांचे नोकरदार वर्गांकडून स्तुती करून जिगरी ग्रुपचे संस्थापक राम बांगारे, अध्यक्ष तुकाराम वाघ, लक्ष्मण पादिर, पंढरी उघडे, उमेश वाघ, कैलास पोकळा, संजय वाघ, नामदेव वाघ, या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले असे सांगितले.
IMG-20230919-WA0001त्याचप्रमाणे प्रामुख्याने आपल्या विद्यार्थ्यांनी UPSC, IAS, IPS, IFS परिक्षेत अधिकारी बनवा या विचाराने प्रेरित होवून इंजी. उत्तम डोके यांनी महत्वपूर्ण घोषणा केली. जो विद्यार्थी/ तरुणवर्ग सात जिल्ह्यातून रायगड, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद येथून आदिवासी ठाकूर/ ठाकर समजातून युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) परीक्षा पास होवून आयएएस (IAS), आयपीएस (IPS) किंवा (आयएफएस) IFS बनेल त्याला आज पासून रू. ९९,९९९/- (नव्यानव हजार नऊसे नाव्यानव रुपये) बक्षीस म्हणून देण्यात येईल असे जाहीर केले. हे पैसे ते पुढील चार वर्षात चार टप्यात नोकरवर्ग संस्थेकडे जमा करतील. त्यातील पहिला चेक रू. २५,०००/- (पंचवीस हजार रुपये) या मीटिंगच्या वेळी नोकरदार वर्ग संस्थेचे अध्यक्ष यांना सुपूर्द करण्यात आला. तसेच पुढील येणाऱ्या काही काळात या विचाराशी सहमत असलेल्या समविचारी लोकांकडून वर्गणी गोळा करून ही रक्कम वाढवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना आयएएस ऑफीसर बनण्यासाठी लागणारी आवश्यक साहित्य, पुस्तके व इतर नियोजन याविषयी सखोल माहिती दिली व असे साहित्य लोकवर्गणी तसेच इतर समविचारी लोकांकडून पुढील ५-७ वर्षात सात जिल्ह्यात उपलब्ध करणासाठी पुढील प्रयत्नशील असणार आहेत. सर्व सामूहिक साहित्य प्रथमत पनवेल येथे असेल, अशाप्रकारे विद्यार्थ्यांना आवड निर्माण होण्यासाठी घोषणा केली आहे.

adivasi logo new 21 ok (1)
या बैठकीत प्रामुख्याने नोकरदार वर्गाचे पदाधिकारी मालू वाख, नवनाथ उघडे, इंजी. उत्तम डोके, ऍड. नवसू रेरा, करुण हंबीर, विठ्ठल उघडे, लाड्या मेंगाळ, रमेश उघडे, रघुनाथ खाकर इ. मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास मा.जि.प. सद्स्य गोविंद भला, अनिल कवटे, काशिनाथ शिंगवा, बबन हिरवे, महेंद्र शिद, बारकू वाघ, भरत भला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 2 = 1