फार्म हाऊसवाल्यांनी अडवलेल्या दफनभूमीच्या रस्ताचा शासनाने केला पंचनामा ; पर्यायी रस्ता देण्याचे शेतक-यांनी सांगितले
बेकायदेशीर आदिवासी जमीन घेणारे फार्महाऊस मालक विजय कडू यांच्यावर शासनाच्या नियमानुसार कारवाई करण्याची ग्रामस्थांनी केली मागणी..
पनवेल/ आदिवासी सम्राट :
ताडपट्टी, कोंबलटेकडी या गावाची एकञीत अनेक पिढ्या- पिढ्यांना पासून दफनभूमी आहे. या दफनभूमीकडे जाणारा ताडपट्टी गावाचा रस्ता विजय कडू या फार्महाऊस मालकांनी अडवला होता. त्यामुळे दफनभूमीवर ये -जा करण्यासाठी खुप मोठी अडचण निर्माण झाली होती. मग, काही दिवसापूर्वीच आदिवासी जमीनवर बेकायदेशीर आसणा-या फार्महाऊस मालकांनी ताडपट्टी दफनभूमीचा रस्ता अडवला अशी बातमी विविध वृत्तपत्रात प्रसिद्धी केली होती.
या बातमीची पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांनी तात्काळ दखल घेतली. तहसीलदार विजय पाटील यांनी महसूल विभागातील मंडळ अधिकारी, मोरबे यांना आदेश देत मंडळ अधिकारी यांनी शुक्रवार (१५ सप्टें.) रोजी ताडपट्टी ग्रामस्थ, शेतक-यांना नोटीस काढून स्थल पाहणीसाठी हजर राहण्याचे नोटीसमध्ये सुचना दिल्या होत्या. नोटीसाप्रमाणे ताडपट्टी गावातील सर्व ग्रामस्थ त्या दिवशी उपस्थित होते. परंतु आदिवासी शेतकरी अनुपस्थित होतेच, शिवाय बेकायदेशीर आदिवासी जमीन घेणारे विजय कडू यांना मंडळ अधिकारी अजीत पवार यांनी नोटीस देखील काढली नसल्याने ताडपट्टी ग्रामस्थांनी नाराजी दाखवत फार्महाऊस मालक विजय कडू यांना नोटीस काढा आणि पुन्हा पंचनामा करण्यात यावे, असा आग्रह धरला.
अखेर, दफनभूमीचा रस्ता आडविणारा, बेकायदेशीर आदिवासी जमीन घेणारे फार्महाऊस मालक यांना नोटीस काढत महसूल विभागातील मंडळ अधिकारी अजीत पवार, तलाठी श्री. मेञी यांच्यामार्फत पुन्हा मंगळवार (दि. २६ सप्टेंबर २३) रोजी पंचनामा करण्यात आला. यावेळी आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष गणपत वारगडा व ताडपट्टी गावातील सर्व ग्रामस्थ व भूमीहीन शेतक-यांना वाटप करण्यात आलेले संबंधित आदिवासी शेतक-यांच्या उपस्थित दफनभूमी रस्त्याच्या संदर्भात पाहणी केली. तेव्हा दफनभूमीकडे जाणारा पुर्वी पासून असणारा वहिवाटीचाच रस्ता खुला करा असे ताडपट्टी गावातील ग्रामस्थांनी आग्रह धरला होता. माञ, महसूल विभागातील मंडळ अधिकारी अजीत पवार, तलाठी मेञी यांच्या मध्यस्थीने पर्याय रस्ता शेतक-यांच्या सहमंतीने देण्याचे ठरले. आणि तसा पंचनामा देखील करण्यात आला आहे.
माञ, बेकायदेशीर आदिवासी जमीन घेणारे फार्महाऊस मालक विजय कडू हे अनुपस्थित असल्याने चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार बेकायदेशीर आदिवासी जमीन घेणारे फार्महाऊस मालक विजय कडू यांच्यावर कारवाई करण्याची तहसीलदारांकडे मागणी केली आहे. यावेळी आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष गणपत वारगडा, पोलीस पाटील महादू जाधव, बाळू वारगडा, सिताराम वारगडा, मधू वारगडा, विष्णू चौधरी, चंदर चौधरी, आनंता चौधरी, कमळ्या कांबडी, सिताराम कांबडी, बुधाजी चौधरी, किसन वारगडा, कमळ्या चौधरी, आकाश गडखळ, सुकरी वारगडा, गौरी वारगडा, जर्नादन चौधरी आदी. उपस्थित होते.