यापुढे शेतकऱ्यांची विजयी यात्रा काढायची आहे तर नैनाची अंतयात्रा काढायची – माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते
पनवेल/ प्रतिनिधी :
नैना प्रकल्प विरोधात आमरण उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांच्या उपोषणाच्या आजच्या दहाव्या दिवशी शिवसेना नेते, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याहस्ते उपोषणकर्ते अनिल ढवळे यांच्यासह सर्व १२ उपोषणकर्त्यांना नारळपाणी पाजून उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार विजय पाटील, नैना डेप्युटी कमिशनर सुकेशु पगारे, शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, मा आमदार जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, नैना समितीचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर, मा नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, नारायणशेठ घरत, काँग्रेसचे आर.सी.घरत, सुदाम पाटील, शिवसेना विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, दीपक घरत, योगेश तांडेल, कॉम्रेड भूषण पाटील, प्रशांत पाटील, युवासेनेचे पराग मोहिते, शहर प्रमुख यतीन देशमुख, काशिनाथ पाटील, हेमराज म्हात्रे, आर्किटेक्त्त अतुल म्हात्रे यांच्या उपस्थितीत सदर उपोषण मागे घेण्यात आले.