20210607 205120
कर्जत ताज्या माथेरान सामाजिक

माथेरानच्या जंगलात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृत देह

माथेरानच्या जंगलात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृत देह

कर्जत/ प्रतिनिधी :
माथेरानच्या जंगलात एका अनोळखी व्यक्तीचा मृत देह आढळून आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. या बाबत स्थानिक रहिवाशी हे रस्त्यावरून जात असताना दुर्गंधी येत असल्याने हा प्रकार समोर आला. सदर मयत व्यक्ती झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले असून शरीर कुजलेल्या अवस्थेत दिसत आहे.
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरान घाट रस्त्यालगत दुर्गम परिसरातील गारबट गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना परिसरात दुर्गंधी पसरलेली जाणवल्याने, रस्त्या लागत काही अंतरावर झाडाला लटकलेल्या अवस्थेत मानवी जातीचे शरीर दिसून आले.
हे शरीर पूर्ण कुजल्याने परिसरात दुर्गंधी सुटली होती. लागलीच ग्रामस्थानी या बाबत नेरळ पोलिसांना माहिती दिली. सदर घटनास्थळी नेरळ पोलीस हजार झाले असता, मयत व्यक्ती ही पुरुष जातीचे असून साधारण 8 ते 10 दिवसांपूर्वी ते झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याचे बोलले जात आहे. ऐकूनच या मयत व्यक्तीचा चेहेरा पूर्णतः कुजलेला अवस्थेत दिसून येत असून डोक्यावरील केस देखील गळ्यापर्यंत पसरलेले दिसत आहे. सदर मयत व्यक्ती ज्या ठिकाणी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. त्या ठिकाणी बॅग आढळून आली असून त्या बॅग मध्ये काही लोखंडी शस्त्र देखील सापडली आहेत तसेच मयत व्यक्तीचा मोबाईल देखील पोलिसांना सापडून आला आहे. काही दिवसांपूर्वी माथेरान ला चालत निघालेली ही व्यक्ती नागरिकांना अडवून स्वतःच्या नोकरी साठी विचारपूस करत होती तर भूक लागली म्हणून सांगत असल्याचे बोलले जात आहे.
सदर घटने बाबत नेरळ पोलीस अधिक तपास करत असून ही हत्या की आत्महत्या हे अद्याप समजू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 74 = 75