मालडुंगे ग्रामपंचायतीने वरिष्ठ कार्यालयाची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रांचा विल्हेवाट लावू नका ; ग्राम विकास संघर्ष समितीने बिडीओंना दिले निवेदन..
रेकॉर्डचा विल्हेवाट लावतांना पंचनामा बनवला. मात्र, पंचनामावर कागदपत्रांचा आणि कालावधीचा उल्लेखच नाही..
ग्रामस्थांमध्ये शंकेचे वातावरण..?
पनवेल/ प्रतिनीधी :
जिल्हातील काही ग्रामपंचायतीमध्ये दिवसेंदिवस कोणत्यांना कोणत्या कारणाने परस्पर ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड किंवा काही कागदपत्रांचा विल्हेवाट लावला जातोय, त्यामुळे भविष्यात स्थानिक ग्रामस्थांना आणि शासकीय यंत्रणेला लागणारे कागदपत्रे मिळणे कठीण होत असते. त्यामुळे प्रत्येक कार्यालयाने वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेवून त्या अटी शर्तीचे पालन करणे आवश्यक असते.
पनवेल तालुक्यातील दुर्गम भागातील आणि शेवटच्या टोकावर असणारी ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगे. या ग्रामपंचातीमध्ये जवळपास १५ ते १६ आदिवासी गाव, वाड्या-पाडे आहेत. तसेच या ग्रामपंचयातमध्ये आदिवासी समाजाची जास्त लोकवस्ती असल्याने ही मालडुंगे ग्रामपंचायत आदिवासी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. ग्रामपंचायत म्हटली की, मासिक, ग्रामसभा, परवानगी, विविध प्रकारचे दाखले, जन्म मृत्यू, घरपट्टी, आवक जावक, जमा खर्च, असेसमेंट रजिस्टर या सारखे अनेक सजिस्टर आणि कागदपत्रांचा समावेश असतो. त्यामुळे या रेकॉर्डचा जतन करने तेवढीच जबाबदारी ग्रामपंचयात कार्यालयाची असते.
अनेक वर्षापासून असणारा मालडुंगे ग्रुप ग्रामपंचायतीचा रेकॉर्डला काही ठिकाणी वाळवी लागली आहे, असे सांगण्यात येते. त्यामुळे त्या रेकॉर्डचा विल्हेवाट लावला जाणार आहे, असे ग्रामपंचायत कार्यालयाकडून सांगितले जात आहे. मात्र, नक्की कोणत्या रेकॉर्डला आणि कागदपत्रांना वाळवी लागली आहे. आणि कोणत्या नाही?? ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डला वाळवी लागेपर्यंत ग्रामपंचायत काय करीत होती?? असे अनेक प्रश्नासहित ग्रामस्थांमध्ये शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे भविष्यात स्थानिकांना किंवा शासकीय यंत्रणेला ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डची गरज लागल्यास तो रेकॉर्ड कसा उपलब्ध होईल? त्याकरिता या सर्व प्रकरणाची चौकशी होण्यासाठी आणि ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डची किंवा कागदपत्रांची विल्हेवाट लावण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाची परवानगी असल्याशिवाय विल्हेवाट लावू नये, यासंदर्भात ग्राम विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष गणपत वारगडा यांनी पनवेलचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.