Img 20241029 Wa0016
ठाणे महाराष्ट्र मुरबाड

मुरबाडमधून सुभाष पवार यांचा शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज

Adivasi Samrat Logo New Website

मुरबाडमधून सुभाष पवार यांचा शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज

मुरबाडमध्ये रॅलीला हजारो नागरिकांची गर्दी

मुरबाड/ आदिवासी सम्राट : मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांनी आज मोठ्या शक्तीप्रदर्शनात खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानिमित्ताने मुरबाड शहरातील वातावरण महाविकास आघाडीमय झाल्याचे पाहावयास मिळाले.

Img 20241029 Wa0016

मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सुभाष पवार यांना उमेदवारी दिल्याने महायुतीपुढे आव्हान निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुरबाड मधील कुणबी भवन येथून रॅलीला सुरुवात झाली. बेंजो, ब्रास बॅण्ड, ढोलच्या गजरात शहराच्या विविध भागातून रॅली निघाली. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर संतोषी माता मैदानात रॅली पोहोचल्यावर झालेल्या जाहीर सभेत मुरबाड मतदारसंघात परिवर्तन घडविण्याचे आवाहन करण्यात आले. या रॅलीच्या निमित्ताने मुरबाड तालुक्याने इतिहासातील सर्वात मोठी रॅली अनुभवली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे, लोकनेते आमदार गोटीरामभाऊ पवार, शिवसेनेचे उपनेते अल्ताफ शेख, उमेदवार सुभाष पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे, जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे, कॉंग्रेसचे बदलापूर शहर अध्यक्ष संजय जाधव, मुरबाड तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर घुडे, संतोष विशे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बदलापूरचे प्रभारी अध्यक्ष कालिदास देशमुख, विश्वनाथ जाधव, जयराम मेहेर, लियाकत शेख, सुधीर पष्टे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कविता वरे आदी उपस्थित होते. मुरबाड हा सुसंस्कृत मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. मात्र, गेल्या १५ वर्षात मतदारसंघाचे नुकसान झाले. बदलापूर शहरात पाणी, वीज आदी प्रश्न तीव्र आहेत. गेल्या १५ वर्षांत फुटले नव्हते, तेवढे नारळ प्रथमच फोडले गेले, अशी टीका उमेदवार सुभाष पवार यांनी केली.
मुरबाड शहरातील भव्य रॅलीने मतदारांमधील उत्साह अनुभवता आला, याबद्दल लोकनेते गोटीराम पवार यांनी कौतुक केले.

Adivasi Logo New 21 Ok (1)
लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही मतदारांनी ताकद दाखवावी. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आदेश अंतिम असून, आता अशक्य काहीही नाही. सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेऊन सुभाष पवार यांना विजयी करावे, असे आवाहन खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 2 = 1