PHOTO-2019-09-15-19-22-27
चिपळूण महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रत्नागिरी राजकीय रायगड

नवा महाराष्ट्र उभा करण्यास साथ द्या…

नवा महाराष्ट्र उभा करण्यास साथ द्या…

युवकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. मात्र पर्यावरणाला धक्का पोचता कामा नये.

  • शिवसेना नेते सचिन भाऊ अहिर यांचे आवाहन
  • चिपळूण येथे जनआशिर्वाद यात्रा व विजय संकल्प मेळावा

चिपळूण/ प्रतिनिधी :
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे नवा महाराष्ट्र घडवू पाहात आहेत, त्यासाठी ते युवक, शेतकरी व कामगार यांच्याशी संवाद साधत असून उद्योग व कारखान्यांत स्थानिकांना शंभर टक्के रोजगार मिळवून देण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यासाठी आदित्य ठाकरे व शिवसेना यांच्या मागे उभे राहा, असे आवाहन शिवसेनेचे नेते व माजी आमदार सचिन भाऊ अहीर (मुंबई) यांनी कोकणवासियांना केले. असे रविवारी (दि. १५ सप्टेंबर) रोजी चिपळूण येथील विजय संकल्प मेळाव्यात बोलत हाेते.
आदित्य ठाकरे यांची जनआर्शिवाद यात्रा सध्या कोकणात आहे. आज चिपळूण मध्ये शिवसैनिकांनी यात्रेचे भव्य स्वागत झाले. त्यावेळी बोलताना मा. अहिर म्हणाले की, कोकणातील प्रत्येक तालुक्यातील बेरोजगारांना काम मिळावे, अशी आदित्य ठाकरे यांची भूमिका आहे. त्यासाठी येथील कारखाने, उद्योग व एमआयडीसीमध्ये स्थानिकांनाच १०० टक्के नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, अशी आदित्य ठाकरे व शिवसेनेने भूमिका घेतली आहे. अशा नेत्याच्या मागे तुम्ही उभे राहिले पाहिजेत. आदित्य ठाकरे यांना शेतीतले काय कळते? अशी विरोधकांनी टिका केली होती. पण, आदित्य ठाकरे यांनी २०१४ नंतर राज्याच्या एका एका जिल्ह्यात तीनतीन वेळा दौरे केले आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुर व युवक-युवतिंशी ते संवाद साधत आहेत, असे ते म्हणाले.
पूरग्रस्त सांगली, कोल्हापुर जिल्ह्यात सरकारी मदतीपूर्वी शिवसेनेची मदत पोचली होती. आज तुम्हाला गाऱ्हाणे सांगायला मंत्री किंवा शासकीय अधिकारी मिळत नाहीत. पण शिवसेना नेतृत्व आज तुमच्या उंबऱ्यापर्यंत आले आहे. अशा नेत्यांच्या, अशा पक्षाच्या मागे तुम्ही उभे राहा आणि नवा महाराष्ट्र घडवण्यासा साथ द्या, असे आवाहन सचिन अहिर यांनी व्यासपीठावरुन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 18 = 21