उरण

माझा मुलगा प्रीतम म्हात्रेला मी तुमच्या हवाली करत आहे, त्याला विधानसभेत पाठवा- जे एम म्हात्रे

  • माझा मुलगा प्रीतम म्हात्रेला मी तुमच्या हवाली करत आहे, त्याला विधानसभेत पाठवा- जे एम म्हात्रेImg 20241118 Wa0010

उरण/आदिवासी सम्राट 

      मतदार संघात समाजाच्या सेवेचे यथाशक्ती काम करताना समाजसेवेचा हा रथ असाच पुढे चालविण्यासाठी मी माझा मुलगा प्रितम तुमच्या हवाली करत आहे, त्याला तुम्ही विधानसभेत पाठवा असे भावनिक आवाहन जे एम म्हाञे यानी मोहोपाडा येथे भव्य जाहीर सभेत केले. उरण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे शेकाप उमेदवार प्रितम जे एम म्हात्रे याच्या निवबणूक प्रचारार्थ जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मा आमदार भाई जयंत पाटील, मराठा महासंघाचे विनोद साबळे, नारायणशेठ घरत, रमाकांत म्हाञे, जितेंद्र म्हाञे, उत्तमराव गायकवाड, शिवाजी काले , राजाराम पाटील, सचीन ताडफले, महेश साळुंखे, मनोहर पाटील, जगदिश पवार, अनिल ढवले आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी बोलताना जे एम म्हाञे म्हणाले की गेली दहा वर्षात उरण विधानसभेत शेकापचा आमदार नसल्याने मतदार संघात रस्ते, पाणी व इतर अनेक समस्या नागरिकाना भेडसावत आहे. माञ येथील आमदारानी विभागात साधी कधी भेटही दिली नाही. त्यामुळे या समस्यानी उग्र रूप धारण केले आहे. या भागातील अनेक मंदिराना आपण यथाशक्ती मदत केली आहे. कोरोना काळात मला शक्य होईल तेवढी मदत नागरिकाना पोहचवण्याचे काम आपण केले आहे. इर्शालवाडी दुर्घटनेच्या वेळीही आपण मदतीसाठी सर्वाच्या आधी येथे पोहचलो. येथील जनतेशी आपले जिव्हाळ्याचे संबध आहेत. भविष्यात आपल्याला हा सास्कृतिक संवाद असाच पुढे चालू ठेवायचा आहे. त्या टृष्टीने मी माझ्या मुलाला प्रितमला निवडणूकीच्या रिंगणात उतरवले असून त्याला निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी आपली आहे. तुम्हीच आता त्याला सांभाळा असे भावनिक आवाहन त्यानी केले. यावेळी बोलताना माजी आमदार भाई जयंत पाटील यांनी सांगितले की या मतदारसंघांमध्ये तरुण नेतृत्व येत आहे. तिसरी मुंबई या ठिकाणी उभी राहत असून या ठिकाणी जो विकास होणार आहे. त्यावेळेस आपला प्रतिनिधी या ठिकाणी हवा आहे यासाठी प्रीतम जे एम म्हात्रे यांना विजयी करायचे आहे. प्रीतम म्हात्रे आमदार झाल्यानंतर चांगली कामे होतील. प्रीतम म्हात्रे मोठ्या दिमाखाने विधानसभेत जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.Img 20241118 Wa0011
    यावेळी बोलताना मराठा महासंघाचे समन्वयक विनोद साबळे म्हणाले की जे एम म्हाञे हे सदैव आपल्या सुखदुखात आपल्या सोबत राहिले आहेत. त्यामुळे आज निवडणुकीच्या प्रसंगी आपण सर्व ताकदीनिशी आपण त्याच्या पाठीशी उभे राहणे आपली जबाबदारी बनते. त्याच्या समाजसेवेचे प्रतिक म्हणून प्रितम जे एम म्हाञे आज आपल्यासमोर उभे आहे. त्याचा स्वभावही विनयशिल व समोरच्या माणसाला मदत करणारा आहे. नेहमी माणसात राहून सर्वाना मदत करण्याची भावना असलेल्या प्रितम म्हाञे याना यावेळी प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यानी केले. शिवाजी काले म्हणाले की जे एम म्हात्रे यांचे व्यक्तिमत्व अजातशञु आहे त्यानी आपल्या जिवनात सर्वसामान्य व अडचणीत असलेल्या माणसाला मदतच केली आहे तोच वारसा त्याचे पुञ प्रितमदादा म्हाञे चालवित आहेत. निवडणुकीच्या निमीत्ताने ते आज आपल्याकडे मताची अपेक्षा करत आहेत. त्यामुळे त्यांची ही अपेक्षा आपण त्यानी अपेक्षा ठेवल्या पेक्षा जास्त प्रमाणावर पूर्ण करायची आहे. यावेळी या सभेला मोठा जनसमुदाय लोटला होता. जणू काही विजयाचीच ही सभा आहे असे येथील कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी बोलून दाखवले.
     यावेळी बोलताना सचीन ताडफळे म्हणाले की गेल्या १० वर्षात या मतदार संघात केंद्रात सत्ता,, राज्यात सत्ता असणाऱ्या आमदारानी विकासाची एक वीट रचली नाही. त्याचे दुष्परिणाम तालुक्यातील जनतेला भोगावे लागत आहे. आज तालुक्यातील युवकाना रोजगाराचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. प्रितमदादानी या तरूणाईच्या हाताला काम देण्याचा विडा उचलला आहे. युवकाना प्रशिक्षण देवून त्याना रोजगाराच्या बाजारात सक्षम करण्याचे व्रत त्यानी घेतले आहे. या माध्यमातून त्यानी ४४ युवकाना विमानतळावर रोजगार मिळवून दिला आहे.भविष्यात हे काम व्यापक प्रमाणावर करण्याचे त्यानी ठरवले आहे. महिलाच्या गर्भाच्या पिशवीचा कॅन्सर तसेच स्तनाच्या कॅन्सरची समस्या नष्ट करून लाडक्या बहिणीना उत्तम आरोग्य प्रदान करण्याचा त्याचा हेतू आहे. त्यांचे व्हिजन पाहता प्रितम म्हाञेच तालुक्याला विकासाच्या वाटेवर घेवून जावू शकतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.