कु. सृष्टी शिद हिच्या मृत्यू प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार गणपत वारगडा यांनी प्रकल्प अधिकारी श्री. धाबे यांची घेतली भेट
आदिवासी समन्वय समितीच्या वतीने
आश्रमशाळेतील दोषींवर कठोर कारवाई करून कुटूंबांना शासकीय आर्थिक मद्दत करण्याबाबत दिले पत्र
पनवेल/प्रतिनिधी :
उरण तालुक्यातील चिरनेर आश्रमशाळेत शिकत असणारी पनवेल-तामसई येथे राहणारी कु. सुष्टी राजू शिद हिचा मृत्यू आश्रमशाळेत गुरुवारी (दि.१९ डिसें. २४) रोजी अचानक झाला. यासंदर्भात काही कु. सृष्टी शिद हिच्या कुटूंबांनी व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला.
मात्र, अजूनही कु. सृष्टीच्या कुटूंबांना न्याय मिळालेला नाही. आजही कु. सृष्टीला न्याय मिळण्यासाठी तिच्या कुटूंबांना वणवण करावी लागत आहे. हिच सामाजिक बांधीलकी म्हणून पत्रकार गणपत वारगडा यांनी प्रकल्प अधिकारी श्री. धाबे यांची भेट घेतली. चिरनेर आश्रम शाळेत शिकत असणारी कु. सृष्टी शिद हिचा मृत्यू झाल्याने त्याची सविस्तर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा आणि कु. सुष्टी शिद हिच्या कुटूंबांना शासकीय आर्थिक मद्दत करा असे पत्र मा. प्रकल्प अधिकारी यांना आदिवासी समन्वय समितीच्या वतीने गुरुवार (दि. १६ जाने. २५) रोजी पत्र दिले.
यावेळी प्रकल्प अधिकारी श्री. धाबे यांनी हा विषय गांभीर्याने घेतला जाईल असे सांगून संबंधितांना सुचना देखील दिल्या. शिवाय संस्थेच्या वतीने आर्थिक मद्दत करण्याचे तरतूद केली आहे, तसेच शासकीय आर्थिक मद्दत लवकरच केली जाईल. असे प्रकल्प अधिकारी यांनी भेटी दरम्यान सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार गणपत वारगडा यांना सांगितले.