Screenshot 20250221 171702 Samsung Internet
अलिबाग कोकण ताज्या महाराष्ट्र रायगड सामाजिक सुधागड- पाली

रायगडमध्ये भीतीचं वातावरण ; भूकंपाचा हादरा बसला…

 

Adivasi Samrat Logo New Website

रायगडमध्ये भीतीचं वातावरण ; भूकंपाचा हादरा बसला…

रायगड / प्रतिनिधी :
रायगड जिल्ह्यात पेण, सुधागड तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. पेणच्या तिलोरे, वरवणे तसेच सुधागड तालुक्यातही महागाव, भोपेची वाडी, देऊळ वाडी, कवेळी वाडी भागात जमिनीला हादरे बसल्याची माहिती समोर आली.

 

Adivasi Calender 2025 Png

पेण तहसीलदार तानाजी शेजाळ आणि सुधागड तहसीलदार कुंभार यांनी ही माहिती मिळताच तातडीनं प्रभावित गावांना भेट दिली. महसूल विभागाच्या पथकासह ते गावांमध्ये दाखल झाले. रायगडमधील वरील गावांमध्ये जमिनीला हादरे बसून भूगर्भातून आवाज आला, घरातील भांडी हलली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दरम्यान यामध्ये इतर कोणतंही नुकसान झाली नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली.
असं असलं तरीही भूकंपामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. सदर प्रकरणाची माहिती महसूल प्रशासनाने वेधशाळेला दिली. हवामान विभागाच्या भूकंप मापन केंद्र किंवा संकेत स्थळावर याची नोंद नाही ही बाब यावेळी समोर आली. ज्यामुळं आता जिओलोजिकल सर्व्हे ऑफ इंडिया संस्थेला सर्वेक्षण करण्याची विनंती करणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.

Adivasi Logo New 21 Ok (1)