गायिका उषा वारगडा यांचा हॅक केलेला ई-मेल व युट्युब चॅनेल आला परत…
युट्युब चॅनेल हाताळणारा मावस भावांनी हॅकरची केली बत्तीगुल..
पनवेल / प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्त्या, आदिवासी समाजातील गायिका उषा वारगडा यांचा ई-मेल आणि युट्युब चॅनेल गुरुवार (दि. २७ फेब्रु.२५) रोजी पहाटे ३.०० वाजेच्या सुमारास हॅक केला होता. हे समजातच उषाताईने आपला युट्युब चॅनेल हाताळणारा मावस भाऊ कैलास मेंगाळ, मछिंद्र वाघ यांना सांगताच त्या दोघांनीही त्वरित ई-मेल, युट्युबला ट्विट आणि मेल केला होता. मात्र त्या अगोदरच हॅकरने पासवर्ड, रिकव्हर मोबाईल नंबर आणि युट्युब चॅनेलमध्ये s1mple असा बदल केला होता.
हॅकरचे सध्या स्थितीतचे ठिकाण USA अमेरिकामध्ये दाखवत होता. तरीही युट्युब चॅनेल हाताळणारा मावस भाऊ कैलास मेंगाळ, मछिंद्र वाघ यांचे दोघांचेही ई-मेल आणि युट्युबकडे मेलच्या माध्यमातून बोलणं चालू होते. नंतर युट्युबने तो चॅनेल डिसाब्लेड केला. मात्र ई-मेलचा दुरुपयोग होऊ नये, म्हणून घडलेली सविस्तर माहिती सामाजिक कार्यकर्ते गणपत वारगडा, गायिका उषा वारगडा यांनी पनवेल पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून शुक्रवार (दि. २८ फेब्रु.२५) रोजी लेख तक्रार दाखल केली होती.
युट्युबने डिसाब्लेड केलेला चॅनेल हॅकरने परत s1mple या नावे चालू केला असल्याचे युट्युबवर दिसून आला. मात्र युट्युब चॅनेल हाताळणारा मावस भाऊ कैलास मेंगाळ, मछिंद्र वाघ हे दोघेही सातत्याने ई-मेल आणि ट्विट करत राहिल्याने सोमवार (दि. ३ मार्च २५) रोजी हॅक केलेला उषा वारगडा यांनाच ई-मेल आणि युट्युब चॅनेल परत आला. आता युट्युबवर उषा वारगडा नाव टाकले कि चॅनेल दिसून येतच पण उषा वारगडा यांची गाणी ही दिसून येतात. परंतु, ई-मेल आणि युट्युब चॅनेल परत आणतांना उषाताईचे मावस भाऊ कैलास मेंगाळ, मछिंद्र वाघ यांना तारेवरची कसरत करावी लागली. शेवठी USA दुसऱ्या देशातील लोकेशन दाखवणारा हॅकरची या दोघांनी बत्तीगुल केली.