Img 20250304 Wa0009
अलिबाग कोकण ठाणे नवी मुंबई महाराष्ट्र रायगड सामाजिक

धामणी गावातील तरुणांनी आदिवासीकरिता भरवली सर्वांधिक मोठे क्रिकेटचे सामने..

Adivasi Samrat Logo New Website

धामणी गावातील तरुणांनी आदिवासीकरिता भरवली सर्वांधिक मोठे क्रिकेटचे सामने..

२.५ लाखापेक्षा अधिक रक्कमेचे पारितोषिकासह मालिकावीरांसाठी २ बाईकचे आयोजन ; ठाणे व रायगड जिल्ह्यात जय महाराष्ट्र चषकाची चर्चा..

पनवेल / प्रतिनिधी :
जय महाराष्ट्र संघ धामणी येथील तरुणांनी आगळा वेगळा आयोजन या क्रिकेट सामान्यांत करून दाखवले आहे. तीन लाखापेक्षा अधिक रक्कमेची क्रिकेट सामान्याचे आयोजन मंगळवार (दि. २५ फेब्रु. ते २ मार्च) रोजी केले होते. विशेष म्हणजे आता पर्यत आदिवासी समजतलं कोणालाही शक्य झाले नाही असे दोन मालिकावीरासाठी २ बाईक तर उत्कृष्ट गोलंदाज, फिल्डर, फलंदाज यांना ३ स्पोर्ट्स सायकल देखील ठेऊन या सामन्यात ५ फुटापेक्षा अधिक उंचीचे चषक पाहायला मिळाल्या. तसेच आयोजन हे कोणत्याही राजकीय नेत्यांचे नसून गावातील तरुणांनी स्वतःच्या खिशातून वर्गणी काढून सामन्यांचे आयोजन यशस्वी केले.
Img 20250305 Wa0006२०२५ जय महाराष्ट्र चषकामध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. मंचावर उपस्थित राहत असणाऱ्यांकडून सातत्याने आयोजकांचे स्थूती होत होती. आदिवासी समाजात पहिल्यांदाच एवढ मोठं आयोजन असल्याने प्रत्येक खेळाडू आणि क्रिकेट रशिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचा हस्य दिसून येत होतो. या क्रिकेट सामन्यात अंतिम सामना रविवार (दि. २ मार्च) रोजी पार पडत असतांना क्रिकेट रशिकांची तुफान गर्दी पाहायला दिसत होती. लाईव्ह युट्युब चॅनेलवर चक्क ४० हजारापेक्षा अधिक लोक घरी बसून या क्रिकेट सामान्यांची मज्जा घेत होती. शेवठी, अंतिम सामन्यांमध्ये सुरेश ११ खांदा आणि बहनोली संघात मोठा संघर्ष होत असतांना सुरेश ११ खांदा (पनवेल) संघांनी प्रथम क्रमांक पटकावला तर दुसरा क्रमांकावर बहनोली (बदलापूर) संघाने नाव कोरले. तसेच तृतीय क्रमांक सावरसाई (पेण), चतुर्थ क्रमांक पोगाव (भिवंडी), पाचवे क्रमांक झुगरेवाडी (कर्जत), सहावा क्रमांक वाघाचीवाडी (panvel) संघांनी बाजी मारली. तर मोठ्या गटातील बाईक मालिकावीर झुगरेवाडीचा प्रवीण सावळा आणि लहान गटातील बहनोलीचा विलास हवाली बाईक मालिकावीर ठरला. त्यांचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज सुनिल नाईक, उत्कृष्ट फिल्डर महेश वाघ, उत्कृष्ट फलंदाज पोगावचा विश्वास यांना स्पोर्ट्स सायकल देऊन उत्तेजीत केले.
Img 20250304 Wa0008यावेळी बक्षीस वितरणाला आदिवासी समन्वय समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष, पत्रकार गणपत वारगडा, उद्योजक आंनता शिद, मालडुंगे ग्रामपंचायतीचे सदस्य जयवंत भस्मा, समालोचनमध्ये सातत्याने चर्चा असणारे योगेश वाघ, सामाजिक कार्यकर्ते रमेश पारधी, राघो भस्मा, बाळू खंडवी, आयोजकांचे सहकारी अजय भस्मा, अवी वाघ, मनोज फसाले, अमोल वीर, जय महाराष्ट्र संघाचे मुख्य आयोजक प्रकाश झुगरे, रामदास खंडवी, समीर खंडवी, कल्पेश खंडवी, पिंटू शिद, शत्रू झुगरे, सॅमी खंडवी , जगण झुगरे, सागर खंडवी, बाळू खंडवी, विलास खंडवी , अनिल निरगुडा, मंगेश खंडवी, राजा भस्मा, राजा खंडवी , भरत झुगरे, रवी झुगरे, अमर खंडवी, बाळू भस्मा, अरविंद खंडवी आदी. क्रिकेट रसिकांची उपस्थिती होती.

Adivasi Calender 2025 Png