Img 20220122 Wa0027
खारघर ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक

वीजचोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर जाणाऱ्या इसमाविरूद्ध गुन्हा दाखल 

वीजचोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर जाणाऱ्या इसमाविरूद्ध गुन्हा दाखल 

पनवेल/ प्रतिनिधी :
दिवसेंदिवस विजचोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणच्या पथकांकडून करडी नजर ठेवण्यात येत असून विजचोरी करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येत आहे. या अनुषंगाने खारघरमधील शाखा -४ येथील ओवे गावात येथे शाखा अधिकारी शकील अहमद यांना मिळालेल्या माहितीनुसार वीजचोरी पडकडण्यासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर जे पाटील (खारघर उपविभाग प्रमुख) आणि सहाय्यक अभियंता शकील अहमद हे शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन गेले असता ओवे गावातील इस्माईल मिया अ. पटेल या इसमाने आर जे पाटील यांना धक्काबुक्की केली. एवढं करून हे विजचोर थांबले नाहीत, तर त्यांनी पाटील यांचा गळा देखील दाबला आणि एमएसईबी वाल्यांना बघून घेतो अशी धमकी देखील दिली. 
आर जे पाटील हे अतिरिक्त कार्यकारी अभियंता, खारघर उपविभाग प्रमुख (महावितरण) या पदावर काम करीत असून खारघर शहरातील विद्युत यंत्रणेची देखभाल, दुरुस्ती, बिलिंग व वीजचोरी थांबवण्याकरिता योग्य प्रतिबंधात्मक कारवाई करणे व वीजचोरी केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास करणे तसेच शाखा अधिकारी यांना आवश्यक तेथे मदत करणे याप्रमाणे कामकाज पाहतात. आज (शनिवार दि.२२ जानेवारी) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास खारघरमधील ओवेगाव येथे शाखा अधिकारी शकील अहमद यांना मिळालेल्या माहितीनुसार महावितरणचे ७ कर्मचारी ओवेगावतील घर क्रमान ५२/बी२ पहिला मजला याठिकाणी राहणारा इसम इस्माईल मिया अ. पटेल यांच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये लावलेल्या मीटरची तपासणी केली असता त्यांनी वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. म्हणून सकाळी ७:४९ वाजता कायदेशीर कारवाईप्रमाणे मीटर व वायर काढत असताना सदर आरोपी आरडाओरडा करू लागला व महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालू लागला. त्याला समजवण्याचा प्रयत्न केला असता त्याने महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून गळा दाबला व धमकी देखील दिली.       

या घटनेची नोंद खारघर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. फिर्याद नोंदवण्यासाठी वाशी मंडळ अधीक्षक अभियंता श्री. माने, पनवेल विभाग कार्यकारी अभियंता सतीश सरोदे व उपविभागातील सर्व सहाय्यक अभियंता तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 2 = 4