Img 20250722 Wa0002
संपादकीय

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके देवा भाऊ यांना विक्रमी रक्तदानातून सेवाभावी शुभेच्छा देऊया” – आमदार विक्रांत पाटील

Adivasi Samrat Logo New Website“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके देवा भाऊ यांना विक्रमी रक्तदानातून सेवाभावी शुभेच्छा देऊया” – आमदार विक्रांत पाटील

पनवेल/आदिवासी सम्राट : महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस म्हणजे प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासाठी उत्साह आणि उत्सवाचा दिवस. प्रत्येक वर्षी लाडक्या देवा भाऊंचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साकारला जातो.

Img 20250715 Wa0010यावर्षी राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानुसार विक्रमी रक्तदान करून देवा भाऊंना अनोख्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करणार आहेत. याच निमित्ताने कामोठे येथे मसाला मंत्रा बँक्वेट हॉल, सेक्टर 36 याठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे व रक्ताचा असलेला तुटवडा भरून काढण्यासाठी प्रयत्न करावा आणि ह्याच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंसाठी राष्ट्रभक्तीने फुललेल्या शुभेच्छा असणार आहेत असे आवाहन आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
Img 20250722 Wa0002यासाठी ऑनलाईन स्वरूपात पूर्व नोंदणी करावी अथवा 9833104666 या क्रमांकावर आपले नाव व रक्तादना करिता येण्याची वेळ नोंदीत करावी अशी विनंती ही आमदार विक्रांत पाटील यांनी केली आहे. तसेच रक्तदान शिबिराची वेळ सायं. 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे. तरी नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये उस्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन ही त्यांनी केलेले आहे.

Adivasi Calender 2025 Png