सह्याद्री आदिवासी ठाकर ठाकूर महाराष्ट्र राज्य संघटनेची सभा उभाडे येथे संपन्न..
महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष तथा अनुसूचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख (राज्य मंत्री दर्जा) आमदार दौलत दरोडा यांच्या प्रमुख उपस्थिती अनेक जिल्हाध्यक्ष पदांच्या केल्या नियुक्त्या
पनवेल/प्रतिनिधी :
सह्याद्री ठाकर ठाकूर महाराष्ट्र राज्य संघटनेची सभा उभाडे येथे सोमवार (दि. १४ एप्रिल) आयोजित केली होती. या सभेचे अध्यक्ष स्थानी शहापूरचे आमदार व महाराष्ट्र राज्य सह्याद्री ठाकर ठाकूर संघटनेचे अध्यक्ष तथा अनुसूचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख (राज्य मंत्री दर्जा) आ. दौलत दरोडा होते.
या महाराष्ट्र राज्य कमिटी मिटिंगला अनेक जिल्हातुन पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहवून संघटनेचे अध्यक्ष, राज्य मंत्री दर्जा आमदार दौलत दरोडा, उपाध्यक्ष माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, सचिव माजी आमादर गांगड बाबा, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा ठाणे जिल्हाध्यक्ष जानू हिरवे यांच्या उपस्थिती आदिवासी ठाकर ठाकूर समाजाच्या प्रश्न, अडचणीवर चर्चा करण्यात आली. नंतर महाराष्ट्र राज्य कमिटीवर सदस्यांची व काही जिल्हामध्ये जिल्हाध्यक्ष पदांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सदस्य दत्तात्रय महादू बरोरा, भास्कर जाधव, एकनाथ झुगारे, गंगाराम मेंगाळ, सीताबाई पथवे यांची नियुक्ती करण्यात आली. तर जळगाव जिल्हाध्यक्ष रामनाथ मेंगाळ, संभाजी नगर जिल्हाध्यक्ष श्रावण दोरे, नाशिक जिल्हाध्यक्ष संजय लोते, पालघर जिल्हाध्यक्ष एकनाथ दरोडा, पुणे जिल्हाध्यक्ष संजय मोघे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य संघटनेचे सल्लागार सुधाकर मेंगाळ,भाऊराव उघडे, शिवाजी मेंगाळ, पत्रकार गणपत वारगडा, राजू गांगड, जयवंत शिद, मारुती आघाण, सोनू मेंगाळ, अजय कडाली, पांडुरंग कातवारे, राजू पोकळा, जानू शिंगवा, नथू गांगडसह सर्व पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.