स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करुन इंग्रजांच्या छाताडावर बसून क्रांतिवीर वासुदेव फडकेंच काम
क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यावर मालिका तयार करण्याचा विचार सुरू असताना त्यांच्या जयंतीचे आमंत्रण मिळाले हेच भाग्य – अभिनेते महेश कोठारी
स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करुन इंग्रजांच्या छाताडावर बसून आद्य क्रांतिवीर वासुदेव फडकेंनी काम केले. क्रांतिवीरांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी क्रांतिकारी संघटना काम करीत आहे. गेल्या काही वर्ष पनवेलमध्ये आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडकेंचा पुतळा उभारण्यासाठी परवानगी मिळाल्यास सर्व खर्च क्रांतिकारी सेवा संघ करेल.
– नामदेवशेठ फडके, संस्थापक/अध्यक्ष
क्रांतिकारी सेवा संघ, महाराष्ट्र
————————————–
पनवेल / प्रतिनिधी :
क्रांतिकारी सेवा संघ यांच्यातर्फे ४ नोव्हेंबर रोजी वाकड़ी येथे पनवेलचे सुपुत्र व आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अभिनेते महेश कोठारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच वासुदेव बळवंत फडके याना भारत रत्न देण्याची मागणी करण्यात आली. स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करुन इंग्रजांच्या छाताडावर बसून आद्य क्रांतिवीर वासुदेव फडकेंनी काम केले. क्रांतिवीरांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी क्रांतिकारी संघटना काम करीत आहे. गेल्या काही वर्ष पनवेलमध्ये आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. पनवेल येथील क्रांतिकारी सेवा संघ वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्याची माहिती घरोघरी करून देत आहे. ४ नोव्हेंबर रोजी फडके यांच्या 175 व्या जयंतीनिमित्त आद्य क्रांतीविर चौक नविन पनवेल ते वाकडी भव्य मिरवणुक सोहळा काढण्यात आला. वाकड़ी येथील सोसायटीच्या आवारात जयंती सोहळा साजरा करण्यात आला. यावे ळी अचला वाजेकर यांनी क्रांतिकारकाचा इतिहास उपस्थिताना समजावून सांगितला. फडके यानी 18 पगड जातीची लोक सोबत घेऊन बंद इंग्रजा विरुद्ध पुकारले. त्यामुले सशक्त क्रांतीचे जनक म्हणून वासुदेव बळवंत फडके याना ओळखले जाते. फडके यानी देशसाठी आपले बलिदान दिले म्हणून त्याना भारत रत्न पुरस्कार मिळावा याची मागणी यावेळी एकमुखाने करण्यात आली.
आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 175 व्या जयंती निमित्त वाकडी येथे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी नृत्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी वासुदेव बळवंत फडके यांच्यावर मालिका तयार करण्याचा विचार सुरू असताना त्यांच्या जयंतीचे आमंत्रण मिळाले हे भाग्य असल्याचे अभिनेते महेश कोठारी यांनी सांगितले. क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवशेठ फडके यानी वासुदेव बळवंत फडके यांचे हें कार्य जिवंत ठेवण्यासाठी क्रांतिकारी सेवा संघाची स्थापना केली. फडके यांनी ईंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. स्वतः गरीबीतुन आल्यामुळे आपली गरिबी कधी विसरू नये असा सल्ला नामदेवशेठ फडके यानी दिला. फडके हे पनवेल तालुक्यातील क्रांतिकारक असल्याने नवीन पनवेल आदई सर्कल येथे वासुदेव बळवंत फडके यांचा पुतळा बांधण्याची परवानगी द्या, एक वर्षाच्या आत त्यांचा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण करून देतो अशी मागणी असे नामदेवशेठ फडके यानी केली. तसेच आदई येथील या चौकाला आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हे नाव देण्याची मागणी देखील करण्यात आली. क्रांतिकारी सेवा संघ गेली अनेक वर्षे फडके यांची जयंती साजरी करून त्यांचे विचार गावागावात, घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. १ ली ते 10 वि पर्यंतच्या पाठ्य पुस्तकात आद्य क्रांतीवीरांचा धडा असायला हवा अशी मागणी करण्यात आली. यावेळी रशिया येथे झालेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत सिल्वर मेडल प्रद्युमन म्हात्रे याचा सन्मान करण्यात आला. शिवशाहीर वैभव घरत यांनी पोवाडा सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी संस्थापक अध्यक्ष नामदेवशेठ फडके, अमित फडके, एकनाथ भोपी, सुकापुरचे सरपंच किसन भुजंग, राजेश केणी, भगवान भगत, नारायण पाटिल, डि. के. भोपी, नरेंद्र भोपी यांच्यासह हजारो नागरिक या जयंती सोहल्याला उपस्थित होते.