20191108 224825
ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

गोर गरीब व आदिवासी वाड्यांवरील मुलांसाठी मोफत ” सर्कस शो “

गोर गरीब व आदिवासी वाड्यांवरील मुलांसाठी मोफत ” सर्कस शो “

राजे प्रतिष्ठानच्यावतीने १२ नोव्हेंबर रोजी आयोजन.

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेलमध्ये सध्या ” द ग्रेट भारत सर्कस ” अवतरली असल्यामुळे करमणुकीचा आनंद घेण्यासाठी पनवेलमधील नागरिक मोठ्या उत्साहात सर्कसकडे वळत आहेत. यावेळी पनवेलमधील गोर गरीब व आदिवासी वाड्यांवरील मुलांच्या चेहऱ्यावरही हसू फुलावे या हेतूने या लहानग्यांना सर्कस दाखविण्याचे आयोजन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने व आमचे प्रमुख मार्गदर्शक जितेंद्र खानविलकर तसेच महाराष्ट्र संघटक अच्चूभाई, उपाध्यक्ष नारायण कोळी, राजू मरे, संघटनेचे मुंबई संघटक प्रमुख चंद्रकांत धडके मामा व प्रकाश कोळी यांच्या मार्गदर्शनानुसार राजे प्रतिष्ठानच्यावतीने दिनांक १२ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी १ वाजताच्या शोसाठी करण्यात आले असून यासाठी राजे प्रतिष्ठानतर्फे नोंदणी करून पासेस देण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा संघटक प्रमुख केवल महाडिक यांनी सांगितले.
सर्कस म्हटले की बच्चे कंपनीसह सर्वच वर्गातील नागरिकांना त्याचे अधिक कुतूहल वाटत असत, या सर्कसमधील विदूषकाचे हास्याचे फवारे, विविध प्राणी, उंचच्या उंच उड्या मारणाऱ्या सुंदरी, वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ करून दाखवीत जनतेला ठसविण्याचा विडा उचलली ही सर्कस असल्यामुळे त्याकडे सर्वचजण आकर्षित होत असतात. सर्कस आली की त्याचे १००, २००, ३०० व ४०० रुपये तिकीट दर गोरगरीब मुलांना न परवडणारे असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलविण्याचे काम राजे प्रतिष्ठान पनवेल यांच्या वतीने राजे करण्यात येणार आहे. यासाठी पनवेलमधील खांदा कॉलोनी येथील मैदानावर उभ्या राहिलेल्या या सर्कसमध्ये एका विशेष शोचे आयोजन दिनांक १२ नोव्हेंबर रोजी राजे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले असून तालुक्यातील आदिवासी वाड्यांवरील व गोर गरीब लहानग्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळे हसू फुलविण्याचा प्रयत्न आम्ही सर्व राजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते करीत असल्याचे राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 + 2 =