New Doc 2019 11 10 01.34.18 1
कोकण ठाणे ताज्या महाराष्ट्र सामाजिक

आयुश तर्फे केळवे बीच फेस्टिवलमध्ये वारली चित्र, आदिवासी हस्तकलाकृतींचा स्टॉल

आयुश तर्फे केळवे बीच फेस्टिवलमध्ये वारली चित्र, आदिवासी हस्तकलाकृतींचा स्टॉल

पालघर/ प्रतिनिधी :
पर्यटन आणि स्थानिक संस्कृती प्रोत्साहन उद्देशाने केळवे बीच फेस्टिवल मध्ये आयुश तर्फे वारली चित्र, तसेच आदिवासी हस्तकलाकृतींचा स्टॉल लावण्यात आला आहे. शिवाय हा स्टाॅल दि. ९ ते १० नोव्हेंबर पर्यंतच प्रदर्शन आहे.

● पालघर डायलॉग बैठक सहभाग –
CMO कार्यालयातील सहभाग टीम मार्फत पालघर डायलॉग या उपक्रमा मार्फत जिल्हाधिकारी यांच्या सोबत सगळ्या विभागांचे अधिकारी आणि जिह्ल्यात सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या संस्था यांची रिव्हिव्ह मिटिंग मध्ये आयुश तर्फे कल्पेश गोवारी, बंडू वडाली, पूनमताई चौरे सहभागी होऊन आयुश चे प्रस्थाव आणि अनुभव मांडले. पुढील पाठ पुराव्यासाठी विविध विभागांसोबत बैठक घेण्यात येईल.
● केळवे बीच फेस्टिवल सहभाग-
पर्यटनआणि स्थानिक संस्कृती प्रोत्साहन उद्देशाने केळवे बीच फेस्टिवल मध्ये आयुश तर्फे वारली चित्र, तसेच आदिवासी हस्तकलाकृतींचा स्टॉल लावण्यात आला आहे. सुचिताताई कामडी, बबिताताई वरठा, सुरेंद्रा वसावले, अजय बीज यांच्याकडे स्टॉल चे दायित्व आहे. ९-१० नोव्हेंबर असे २ दिवसाचे प्रदर्शन आहे.
● डहाणू विक्री केंद्र सुरवात –
स्थानिक कलाकृतींची उपलब्धता डहाणू तालुक्याच्या ठिकाणी व्हावी या उद्देशाने विक्री केंद्राची सुरवात करण्यात येते आहे. संजय पऱ्हाड, राजेश मोर यांनी दर्शनी चित्र चितारत आहेत. स्वप्नील दिवे, बंडू वडाली, जयवंत सोमण ह्या केंद्र निर्मिती साठी काम करत आहेत. लवकरच पूर्ण करून सुरवात करण्यात येईल.
आपली कला जपण्यासाठी आदिवासीत्व जातं करून, स्वावलंबी आदिवासी समाज अर्थव्यवस्था निर्माणला हातभार प्रत्येकांनी लावले पाहिजे.