Img 20191116 Wa0022
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

शासनाचा महसूल बुडवणाऱ्या व अवैद्य मद्यविक्री करणाऱ्या धाबे व हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करावी.

शासनाचा महसूल बुडवणाऱ्या व अवैद्य मद्यविक्री करणाऱ्या धाबे व हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करावी.

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचा एल्गार.!

पनवेल/ प्रतिनिधी :
राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधत पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावर व पनवेल तालुका परिसरात अवैद्यरीत्या मद्यविक्री करणाऱ्या व दुय्यम दर्जाची मद्यविक्री करणाऱ्या धाबे व हॉटेल व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्याबाबत पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांच्याकडे लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले.
यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, कार्याध्यक्ष संजय कदम, सल्लागार सुनील पोतदार, उपाध्यक्ष रत्नाकर पाटील, सरचिटणीस मंदार दोंदे, जेष्ठ पत्रकार दीपक महाडिक यांच्यासह सय्यद अकबर, अनिल भोळे, अरविंद पोतदार, मयूर तांबडे, साहिल रेळेकर, गणपत वारगडा, वचन गायकवाड, सुभाष वाघपंजे, कुंभार, मनोहर सचदेव आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर व पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात धाबे व हॉटेल व्यावसाय तेजीत सुरू आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने देशी विदेशी मद्य विक्री करिता व त्याच ठिकाणी प्राशन करण्याकरिता परमिट रूम परवाने देऊ केले आहेत. ज्यांनी ज्यांनी परवाने घेतले आहेत ते शासनाचे सर्व कर राज्य शुल्क विभागाची फी भरून वैधरित्या व्यवसाय करीत आहेत. मात्र पनवेल तालुक्यातील अनेक धाबे व हॉटेलमध्ये अवैध मद्य विक्री व मद्य प्राशन केले जाते. त्यावर कोणाचाही अंकुश नाही. या ठिकाणी बहुतांश डुप्लिकेट मद्य विक्री चढ्या भावाने होत असते. डुप्लिकेट मद्य विक्री व प्राशन केल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच या अवैध विक्रीमुळे महाराष्ट्र शासनाचा महसूल लाखो रुपयांनी बुडविला जातो. या अनुषंगाने पनवेल तालुक्यामध्ये धाबे व हॉटेलवर होणारी अवैध मद्यविक्री विरोधात पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे तक्रार अर्ज सुपूर्द करण्यासाठी पनवेल चे प्रांताधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देण्यात आले.
तसेच या अर्जाची प्रत राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, रायगड जिल्हा उत्पादन शुल्क अधीक्षक व नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे रवाना करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत या विरोधात प्रशासनाने कारवाई केली नाही तर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती तीव्र आंदोलन करेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

.