20191117_091503
ताज्या पनवेल महाराष्ट्र राजकीय

वक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमणावरून मनसे आक्रमक..

वक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमणावरून मनसे आक्रमक

मनसेने दिली महापालिकेवर धडक

पनवेल/ प्रतिनिधी :
शहरातील वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या जुम्मा मस्जिद पटेल मोहल्लाच्या मालकीच्या भूखंड क्रमांक 530 या जागेत अतिक्रमण केलेल्या व्यक्तींवर कारवाई न करता अभय देण्याच्या प्रयत्न करणार्‍या पनवेल महापालिकेवर मनसेने धडक दिली आणि जाब विचारला. येत्या पाच दिवसात यावर कारवाई करण्याचे आश्‍वासन आयुक्तांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपाध्यक्ष अतुल चव्हाण, शहर अध्यक्ष शीतल सिलकर, प्रतिक वैद्य, प्रथमेश सोमण, रुपेश शेटे, संजय मुरकुटे, सिद्धेश खानविलकर, कैलास माळी, राहुल चव्हाण, यतीन देशमुख , रोहित दुधवडकर, प्रसाद परब, इस्माईल तांबोळी, अभि रिंगे , प्रतीक पाटील, राज सावंत, अवधूत ठाकूर आदी. उपस्थित होते.
पनवेल महानगर पालिकेच्या हद्दींतील पनवेल तहसिलदार कार्यालय तथा पनवेल शहर पोलिस स्थानकाचे वास्तुच्या लगत असलेला अंतिम भूखंड क्र. 530 हा जुम्मा मस्जिद पटेल मोहल्ला, पनवेल या न्यासाचे मालकीचा भुखंड असुन सदरहु न्यास हे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात नोंदणीकृत आहे. सदर जुम्मा मस्जिद पटेल मोहल्ला, पनवेलचे मालकीच्या भुखंडावर माहे मार्च 2019 पासुन आजमितीपर्यंत पत्र्याच्या शेडचे बांधकाम अनधिकृतपणे सर्व कायदेशीर बाबींची पायमल्ली करून उभारण्यात आलेले होते व आहे. बेकायदेशीर बांधकामाची योग्य ती चौकशी करून सदरचे बांधकाम काढण्याबाबत मनसेचे प्रभाग अध्यक्ष सिद्धेश खानविलकर यांनी पनवेल महानगरपालिकेकडे मार्च 2019 पासुन वेळो वेळी लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा देखील केलेला होता व आहे. परंतु मार्च 2019 पासुन आजमितीपर्यंत त्याबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही.
सदर बेकायदेशीर बांधकामाचे अनुषंगाने खानविलकर यांनी पनवेल महानगरपालिकेकडे रितसर माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत दि. 07/06/2019 रोजी अर्ज करून सदर बेकायदेशीर बांधकामास महानगरपालिकेने दिलेल्या परवानगीचा तथा बांधकामाची परवानगी मिळणेबाबत पालिकेकडे आलेल्या अर्जाचा व दाखल कागदपत्रांचा तपशिल मागवीलेला होता. सदर अर्जाचे अनुषंगाने पालिकेने दि. 21/06/2019 रोजीच्या माहितीप्रमाणे फायनल प्लॉट क्र. 530 मध्ये शेड उभी करण्यास कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही, असे स्पष्टपणे नमुद करण्यात आलेले होते.
त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेकडुन रमेश रामलाल माली व विजय खिमजी गडा यांस दि. 26/03/2019 रोजीचे पत्राद्वारे एकदा बांधकाम परवानगी नाकारल्याबाबतचा तपशील व कागदपत्रे देखील खानविलकर यांना पालिकेकडुन प्राप्त झालेली आहेत असे असतांना देखील पनवेल महानगरपालिकेला ज्ञात असुन तसेच पनवेल येथील तहसिदार कार्यालय  व पनवेल पोलीस स्थानकाच्या शेजारी असलेले बेकायदेशीर बांधकाम नक्की कोणाच्या मेहरबानीने राजरोसपणे कायद्याची पायमल्ली करत उभे आहे याचा बोध होत नाही. वास्तविक पाहता सादर भूखंड हा जुम्मा मस्जिद पटेल मोहल्ला, पनवेल या न्यासाचे मालकीची असुन सदरहु न्यास हे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात नोंदणीकृत आहे. द वक्फ ऍक्ट  1995 आणि द वक्फ प्रॉपर्टीज लिज  रूल्स 2014 मधील तरतुदींच्या अधीन राहुनच सदरहु भुखंड लिजवर देण्याची तजवीज करता येते.
परंतु पनवेल महानगर पालिकेकडुन प्राप्त झालेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे लक्षात येते की द वक्फ प्रॉपर्टीज लिज रूल्स 2014 मधील नियमांस केराची टोपली आहे. याबाबत मनसेने केलेल्या पाठपुराव्याकडे पालिकेने कान डोळा केला होता.
यावर मनसेने आक्रमक भूमिका घेत अनधिकृत बांधकाम ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत कळविले आणि पालिकेवर धडक दिली. पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना याबाबत जाब विचारण्यात आला त्यावर योग्य निर्णय घेऊन येत्या चार ते पाच दिवसात कारवाई करण्याचे आश्‍वासन त्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले. यावर देखील कारवाई न झाल्यास येत्या काही दिवसात मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा मनसेने पालिकेला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

58 − = 56