आदिवासी सेवा संघाच्या कर्जत तालुकाध्यक्ष पदी जैतू पारधी यांची नियुक्ती
नेरळ/ दत्तात्रेय निरगुडे :
आदिवासी समाजाच संघटन वाढावं, समाजात होणारे अन्याय व अन्यायाच्या विरोधात जावून न्याय देणे, त्याचबरोबर समाजातील अडी- अडचणी शासन दरबारी मांडण्यासाठी आदिवासी सम्राट या वृत्तपत्राचे संपादक गणपत वारगडा यांनी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याची स्थापना केली.
संघाच्या माध्यमातून समाजाचे अनेक प्रश्न शासनस्तरावर मांडून न्याय मिळवून देत असतांना आपोआप आदिवासी सेवा संघाची देखील व्याप्ती वाढली गेली आहे. आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी आदिवासी दिनदर्शिका काढून समाजापर्यत पोहचवत असतो. यासारखे अनेक उपक्रम संघाच्या माध्यमातून राबवत असल्याने समाजातील कार्यकर्ते स्वतःहून संघामध्ये सहभागी होवून समाजाचे काम प्रामाणिकपणे करत असतात.
संघाचा विस्तार पुणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील होत असतांना आता कर्जत तालुक्यात संघाचा विस्तार जैतू पारधी यांच्या माध्यमातून होतांना दिसत आहे. जैतु पारधी हा नव्याने आदिवासी सेवा संघाचे कर्जत तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती होत असतांना त्यांनी या अगोदर अनेक प्रश्न शासनस्तरावर मांडून न्याय देण्याचे काम केले आहे. जैतु पारधी हे कर्जत तालुक्यातील ठाकूर – कातकरी संघटनेचे माजी अध्यक्ष होते. समाजासाठी अनेक वेळा आंदोलन, उपोषण व निवेदन देवून शासनस्तरावर वर्चस्व ठेवले आहे. यांची दखल काही वृत्तपत्रांनी सुद्धा घेतली आहे.
या धडपडणा-या सामाजिक कार्यकर्त्याला शासनस्तरावर भांडण्यासाठी संधी मिळावी आणि समाजात संघटन वाढावं या उद्देशाने आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने पञकार गणपत वारगडा यांनी जैतु पारधी यांची कर्जत तालुकाध्यक्ष पदी निवड करून त्यांना नियुक्तीपञ देण्यात आले आहे. जैतु पारधी आदिवासी सेवा संघाच्या कर्जत तालुकाध्यक्ष पदी निवड होताच समाजात त्यांचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे दिसून येत.