IMG-20201102-WA0014
अलिबाग कर्जत कोकण ताज्या महाराष्ट्र रायगड सामाजिक

कर्जतचे बुधाजी हिंदोळे (तात्या) यांची आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र (ASS) राज्याच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी तर जैतू पारधी यांची कर्जत तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती

कर्जतचे बुधाजी हिंदोळे (तात्या) यांची आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र (ASS) राज्याच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी तर जैतू पारधी यांची कर्जत तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती

आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र यांची रायगड जिल्हा व कर्जत तालुका कार्यकारिणी जाहिर

रायगड जिल्हा अध्यक्ष : बुधाजी हिंदोळे (तात्या), रायगड जिल्हा उपाध्यक्ष : भगवान भगत, रायगड जिल्हा सचिव : गणेश पारधी… तर कर्जत तालुक्याचे अध्यक्ष जैतू पारधी, उपाध्यक्ष बाळू ठोंबरे, सचिव जयराम उघडे यांची नियुक्ती

कर्जत/ मोतीराम पादिर :
आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र हे गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाजाचे अडचणी, प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी भांडत असते. त्यामुळे रायगड, पुणे, नवी मुंबई, ठाणे जिल्हा व तालुक्यातील अनेक कार्यकर्ते सुद्धा जोडले गेले. आदिवासी सेवा संघ हे शासन दरबारी रजिस्टर नोंद असल्याने त्याचे वेळोवेळी ऑडीट केले जात आहे. त्यामुळे शासन दरबारी संघाच्या पञव्यहाराचा अधिक व जवळून विचार केला जातोय. आशा कामामुळे समाजात संघटनात्मक काम करण्यास कार्यकर्त्यांमध्ये अधिक उचुकता व आशा वाढते.
कर्जत तालुक्यातील अनेक कार्यकर्ते समाजामध्ये जनजागृती, संघटन करण्यासाठी अग्रेसर आहेत. त्यातील सामाजिक कार्यकर्ते बुधाजी हिंदोळे (तात्या) हे सुध्दा वेळ काढून समाजात झटत असतात. एवढेच नाही तर हिंदोळे (तात्या) स्वतःचे बचत केलेल्या पैशातून अनेकांच्या संसाराला आधार देतात. परिस्थिती बिकट असल्याने अनेकांना तांदूळ तसेच जीवनावश्यक वस्तूंचा देखील समाज बांधवांना पुरवठा करतात. शिवाय, त्यांच्याबरोबर भगवान भगत, गणेश पारधी, जैतू पारधी, जयराम उघडे, बाळा ठोंबरे यासारखे अनेक कार्यकर्त्यांचा सुद्धा तेवढेच समाज सेवेत योगदान आहे.
त्यामुळे समाजात अधिक पट्टीने काम करण्यासाठी व संघटन वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्यात कार्यरत आणि शासन दप्तर नोंद असणा-या आदिवासी सेवा संघात (ASS) अनेक कार्यकर्त्यांनी सामिल होण्याचे निर्णय घेतले. त्यामुळे आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांच्या माध्यमातून समाजात काम करण्याची आवड असणारे समाजसेवक बुधाजी हिंदोळे (तात्या) यांची रायगड जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. तसेच यावेळी रायगड जिल्हा उपाध्यक्ष भगवान भगत, सचिव गणेश पारधी व कर्जत तालुक्याचे अध्यक्ष जैतू पारधी, उपाध्यक्ष बाळू ठोंबरे तर सचिव पदी जयराम उघडे यांची नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी नवनिर्वाचित रायगड जिल्हाध्यक्ष बुधाजी हिंदोळे (तात्या) यांनी संघ व समाजाचे संघटन वाढवणार तसेच समाजात प्रामाणिक पणे विकास कामे करण्याचे देखील आश्वासन दिले आहे. शिवाय, रायगड जिल्हात समाज संघटन बरोबर आदिवासी समाजातील अडी, अडचणी, प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी सातत्याने भांडू व कायदेशीर बाबीनेच प्रश्न सोडवले जातील असे आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांनी सांगितले. तसेच रायगड जिल्ह्यातील व कर्जत तालुक्यातील नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 83 = 92