20210112 092022
ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

बेकायदेशीर जुगारावर पोलिसांचा छापा ; 1 लाख 72 हजारचा ऐवज हस्तगत

बेकायदेशीर जुगारावर पोलिसांचा छापा ; 1 लाख 72 हजारचा ऐवज हस्तगत

पनवेल/ संजय कदम :
बेकायदेशीर जुगारावर पनवेल शहर पोलिसांनी छापा टाकून जवळपास 1 लाख 72 हजार 364 रुपयाची रोख रक्कम व पत्याचे कॅट हस्तगत केले आहेत.
शहरातील तक्का परिसरातील एकविरा हॉटेलच्या बाजूस असलेल्या एका शेडमध्ये काही जण बेकायदेशीररित्या पैसे लावून पत्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळताच विशेष पथकाने पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अन्वयेे कारवाई करून काही जणांना ताब्यात घेतले आहे. तर या ठिकाणी जवळपास 1 लाख 72 हजार 364 रुपयाची रोख रक्कम व 10 पत्यांचे कॅट असा ऐवज हस्तगत केला आहे.