20210105_090030
कोकण ठाणे मुरबाड सामाजिक

आदिवासी सेवा संघाची मुरबाड तालुका कार्यकारणी जाहिर… हनुमान पोकळा यांची मुरबाड तालुका अध्यक्ष पदी, विठ्ठल भुरबुडा सचिव तर मोहन भल्ला यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती

आदिवासी सेवा संघाची मुरबाड तालुका कार्यकारणी जाहिर

हनुमान पोकळा यांची मुरबाड तालुका अध्यक्ष पदी, विठ्ठल भुरबुडा सचिव तर मोहन भल्ला यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती

मुरबाड तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिले; २०२१ आदिवासी दिनदर्शिकेचे सप्रेम भेट

मुरबाड/ प्रतिनिधी :
आदिवासी समाजातील बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी व जनजागृती – प्रबोधन करण्यासाठी पञकार गणपत वारगडा यांनी सन २०१३ साली आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात नवी मुंबई व रायगड जिल्हा मोठ्या प्रमाणात समाजासाठी कामं केली. त्याचबरोबर शासन दरबारी भांडून आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहिले.
ठाणे जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात आदिवासी समाजाची खुप बिकट परिस्थिती आहे. काही भागामध्ये आदिवासींच्या योजना व सुखसोयी पोहचत नाही. या ठिकाणी रोजगारीचा सुद्धा मोठा प्रश्न असून समाजात जनजागृती व प्रबोधन करण्याची काळाची गरज असल्याने ठाणे जिल्हा सुध्दा आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याची शाखा ही मुरबाड तालुक्यात जाहिर करण्याचे अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती. याच उद्देशाने सोमवार (२८ डिसें. २०२०) रोजी मुरबाड तालुक्यातील केळीचीवाडी येथे आदिवासी सेवा संघ, मुरबाड तालुक्याची कार्यकारीणी जाहीर केली.
यावेळी आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा, रायगड जिल्हा सचिव गणेश पारधी, कर्जत तालुकाध्यक्ष जैतू पारधी, बबन निरगुडा सर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते हनुमान पोकळा यांची मुरबाड तालुका अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड केली. तर उपाध्यक्ष दिलीप वाघ, सागर भला, महेश वाघ, कार्याध्यक्ष मोहन भला, सचिव विठ्ठल भुरबुडा, खजिनदार राघो वाख, सहसचिव जगदिश निरगुडा, सहखजिनदार पांडूरंग दरवडा तर सदस्य सुरेश हंबीर, पांडूरंग भला, पंकज सावंत, प्रविण भला, सुभाष पारधी, संजय वाघ, प्रविण खाकर, मधुकर धुपारी, महेंद्रा निरगुडा, प्रमोद धुपारी, सोमनाथ वाघ, नंदू उघडा, विलास पादीर, काशिनाथ भला, भरत निरगुडा, रघुनाथ खाकर, सुनिल दरवडा, नाना खाकर, गोविंद सावंत, दत्ता पारधी, जयवंत निरगुडा, भास्कर भला, शाम खाकर, कैलास पोकळा, विनोद वाघ, उमेश सावंत, रुपेश सावंत, योगेश भला, चंदू मेंगाळ, सुकऱ्या वाघ, महेश वाघ, तुषार वाघ, हनुमान खोडका, अनिल खोडका, रविंद्र वाख, प्रभू दरवडा, सोनू पोकळा, तानाजी भला, रविद्र शिंगवा, विश्वनाथ पारधी, रामचंद्र वाघ, मोहन मेंगाळ, मनोज वाघ, नंदू वाघ, शंकर वाघ, हरि मेंगाळ, सुभाष मेंगाळ, आजय कवटे, गणेश भला, कृष्णकांत सोंगाळ, कल्पेश खाकर, दिनेश पोकळा, चंदू उघडा, काळूराम बांगारा, प्रकाश बांगारा, बळीराम खंडवी यांचे आदिवासी सेवा संघ मुरबाड तालुका सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 8 = 10