आदिवासी जनजागृती विकास संघ रायगड जिल्हा व कर्जत तालुक्याची नविन कार्यकारणी जाहीर..
कर्जत/ प्रतिनिधी :
कर्जत तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे. या कर्जत तालुक्यात आदिवासी जनजागृती विकास संघ कर्जत रायगडची नविन कार्यकारणी आदिवासी ठाकूर समाजातील कार्यकर्त्यांची जाहिर करण्यात आली. या संघाचे संस्थापक बुधाजी हिंदोळा यांच्या अध्यक्षखाली हिऱ्याचीवाडी जाबरुग येथे रायगड जिल्हा अध्यक्ष व कर्जत तालुका अध्यक्ष पदाची बिनविरोध निवड करण्यात आली.
रायगड जिल्हा अध्यक्ष पदी भगवान भगत. उपाध्यक्षपदी भाऊ मेंगळ.सचिव गणेश पारधी.खजिनदार.संजय केवारी. तसेच कर्जत तालुका अध्यक्षपदी जैतू पारधी, उपाध्यक्ष बाळू ठोंबरे, सचिव चंद्रकात पारधी, खजिनदार नामदेव निरगुडा यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. कर्जत तालुक्यातील हिऱ्याचीवाडी जाबरूग येथे रविवारी १३ फेब्रुवारी 2022 रोजी आदिवासी जनजागृती विकास संघ कर्जत रायगड जिल्हा संस्थापक बुधाजी हिंदोळा यांच्या अध्यक्षखाली बैठक घेऊन खेळीमेळीच्या वातावरणात नविन कार्यकारणी निवडण्यात आली. रायगड जिल्हा अध्यक्षपदी भगवान भगत, उपाध्यक्षपदी भाऊ मेंगाळ, सचिव गणेश पारधी, खजिनदार संजय केवारी यांची रायगड जिल्हा कार्यकारिणीवर निवड करण्यात आली. तसेच कर्जत तालुका अध्यक्षपदी जैतू पारधी, उपाध्यक्षपदी बाळू ठोंबरे, सचिव चंद्रकांत पारधी. खजिनदार नामदेव निरगुडा, सल्लागार बाळाराम मुकणे, म्हसा विभाग रमेश बांगारे, कळंब विभागीय अध्यक्ष किसन ढोले, नेरळ विभाग बाळू अघाण, जाबरुग विभाग भरत ठोंबरे, मोग्रज विभाग गजानन भला काही सदस्यपद निवड करण्यात आली.