Img 20220215 Wa0022
अलिबाग कर्जत कोकण नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी  चौथ्यांदा निलेश सोनावणे….. तर उपाध्यक्षपदी गणपत वारगडा, जेष्ठ पञकार आनंद पवार, कार्याध्यक्ष संतोष भगत, सचिव रविंद्र गायकवाड, खजिनदार विशाल सावंत, प्रसिद्धी प्रमुख संतोष सुतार यांची एकमताने निवड

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी  चौथ्यांदा निलेश सोनावणे

तर उपाध्यक्षपदी गणपत वारगडा, जेष्ठ पञकार आनंद पवार, कार्याध्यक्ष संतोष भगत, सचिव रविंद्र गायकवाड, खजिनदार विशाल सावंत, प्रसिद्धी प्रमुख संतोष सुतार यांची एकमताने निवड

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा  सल्लागार दीपक महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली  पनवेल येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली या सभेत पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून पनवेल तालुका पत्रकार संघर्ष  समितीच्या अध्यक्षपदी चौथ्यानंदा निलेश सोनावणे यांची एकमताने निवड करण्यात आली .
आज झालेल्या सभेत  कार्याध्यक्षपदी रायगड पनवेल चे संपादक  संतोष भगत ,उपाधयक्षपदी रायगड टाइम्स चे प्रतिनिधी आनंद पवार, आदिवासी सम्राट चे संपादक गणपत वारगडा, सचिव पदी  लाईव्ह  महाराष्ट्र 09 चे संपादक रवींद्र गायकवाड , खजिनदार पदी माझं  पनवेल चे संपादक विशाल सावंत, प्रसिद्धी प्रमुख पदी वार्तांकन चे संपादक संतोष सुतार यांची सर्वानुमते  एकमताने  निवड करण्यात आली . यावेळी बाळकडू चे प्रतिनिधी  संतोष आमले आदी जण उपस्थित होते .
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या माध्यमातून पत्रकारांना भेडसावणारे विविध प्रश्न शासन दरबारी मांडून न्याय हक्कासाठी समिती लढत आहे . पेन्शन योजना, घरकुल योजना, अयोग्य विमा योजना याकरिता समिती शासनाकडे पाठपुरावा करीत असून आगामी काळात पत्रकारांना ज्या ज्या समस्या  भेडसावत आहेत त्यावर आवाज उठून न्याय हक्कासाठी सनदशील मार्गाने काम करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी यावेळी सांगितले . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 41 = 47