IMG-20220711-WA0016
जव्हार ठाणे सामाजिक

दाभोसा गावात यारी दोस्ती ग्रुप कडून शैक्षणिक उपक्रम संपन्न

दाभोसा गावात यारी दोस्ती ग्रुप कडून शैक्षणिक उपक्रम संपन्न

जव्हार प्रतिनिधी/ मनोज कामडी :
जव्हार तालुक्यातील दाभोसा या निसर्गरम्य धबधबा म्हणून ओळखले जाणारे गाव असून या गावात दिनांक १० जुलै २०२२ रोजी यारी दोस्ती फाऊंडेशन पालघर कडून शाळकरी विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक उपक्रम राबविला.
या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले, शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, शिक्षणाचे फायदे सांगितले. त्यानंतर यारी दोस्ती ग्रुप कडून त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या साहित्यामध्ये विद्यार्थ्याना वह्या, पेन, पेन्सिल असे साहित्य पुरविण्यात आले. हा उपक्रम राबविण्या मागचा यारी दोस्ती ग्रुप चा एकच उद्देश की आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थीनी चांगले शिक्षण घ्यावे, त्यांना लहान वयातच शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून असे लहान लहान शैक्षणीक उपक्रम यारी दोस्ती ग्रुप मार्फत खेडोपाड्यात आयोजित करण्याचे ठरविले आहे.


असे शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी यारी दोस्ती ग्रुप पालघर मधील सर्व मित्र एकत्र येऊन निधी गोळा करून त्यामधून अशी मदत निस्वार्थ भावनेने करत असतात. या शैक्षणिक उपक्रमावेळी शाळकरी विद्यार्थी, गावातील युवा आणि यारी दोस्ती ग्रुप पालघर चे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 65 = 72