Img 20220721 Wa0000
कोकण ताज्या रायगड रायगड

आदिवासींनी अॅपकाॅन कंपनीला ठोकले टाळे…! टाळे ठोकताच कंपनीला आली जाग ; २१ लाख रुपये भाडे देण्याचे केले मान्य

आदिवासींनी अॅपकाॅन कंपनीला ठोकले टाळे

टाळे ठोकताच कंपनीला आली जाग ; २१ लाख रुपये भाडे देण्याचे केले मान्य

वरदानी आदिवासी सामाजिक संस्थेच्यामार्फत मिळाला न्याय ; रायगड जिल्हा आदिवासी सेवा संघाचा पाठिंबासह कार्यकर्ते सक्रिय

खालापूर/ प्रतिनिधी :
खालापूर तालक्यातील दस्तुरी खोपोली येथील सं.नं. ४७/अ/१/अ, क्षेञ २७०.०४.०० पैकी १०.३९.०८ या आदिवासींच्या दळी जमिनीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून अॅफकाॅन कंपनी आपला व्यवसाय करत होते. माञ, अडाणी आदिवासी शेतक-यांना या कंपनीने भाडे दिले नाहीत आणि भाडे देण्यासही तयार नव्हती.
याकरिता येथील आदिवासी शेतक-यांच्या वतीने वरदानी आदिवासी सामाजिक संस्थेने अनेक वेळा प्रशासनाला निवेदन दिले. एवढं नाही तर आंदोलन देखील केलीत. “आमच्या जागेत अॅपकाॅन कंपनी असल्याने एकतर गेल्या ३ वर्षापासून ते आतापर्यंत भाडे द्या, नाहीतर आमची जमिनी खाली करून कायदेशीर कारवाई कंपनीवर करा” यासाठी तालुका आणि जिल्हास्तरावर आदिवासींच्या व्यथा वारंवार वरदानी आदिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष घन:श्याम शिद यांनी मांडल्या होत्या. याकरिता खालापूर तालक्यातील तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या दालनात शासकीय अधिका-यांसोबत संयुक्त बैठका ही लावल्या.

 

परंतु, आदिवासी शेतक-यांना न्याय मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागल असल्याने वरदानी आदिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष घन:श्याम शिद, सुक-या वाघ व आदिवासी शेतक-यांनी आदिवासी सेवा संघ, रायगड जिल्हा कार्यकारीणीचा पाठिंबा घेतला व बुधवार (दि. २० जुलै) रोजी आदिवासी शेतक-यांच्या वतीने अॅपकाॅन कंपनीलाच टाळा लावण्याचा निर्णय आणि कंपनीवर आदिवासी शेतक-यांची फसवणूक केल्याने तात्काळ गुन्हे दाखल करण्यासाठी वरदानी आदिवासी सामाजिक संस्था आणि रायगड जिल्हा आदिवासी सेवा संघाच्या वतीने पुढाकार घेतला. याबाबत खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय शुक्ला, खालपूर तहसीलदार आयुब तांबोळी, खालापूर वनक्षेत्रपाल अधिकारी राजेंद्र पवार यांना देखील पञ दिले होते.


त्यामुळे अॅपकाॅन कंपनीला वरदानी आदिवासी सामाजिक संस्था आणि रायगड जिल्हा आदिवासी सेवा संघाच्या वतीने टाका लावताच महसूल विभाग, पोलीस यंञणा व वनविभागाच्या अधिका-यांसमोरच अॅपकाॅन कंपनीने गेल्या ३ वर्षापासून ते आजपर्यंतचे भाडे देण्याचे मान्य करून संबधित आदिवासी शेतक-यांना तात्काळ भाडे सुध्दा कंपनीच्या वतीने श्री. धिरज यांनी २१ लाख रुपये देण्याचे केले मान्य. त्यामुळे आदिवासी शेतकरी यांच्या वतीने गोविंद जाधव यांनी वरदानी आदिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष घन:श्याम शिद, सुक-या वाघ, आदिवासी सेवा संघाचे संस्थापक, पञकार गणपत वारगडा, आदिवासी सेवा संघ रायगड जिल्हा अध्यक्ष जयवंत शिद, अॅड. कोळंबे यांचे विशेष आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 1 = 5