20210712 163500
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक

बेकायदेशीररित्या जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेलची कारवाई

बेकायदेशीररित्या जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेलची कारवाई

पनवेल/ संजय कदम :
बेकायदेशीररित्या 52 पत्त्यांचा अंदर बाहर नावाचा जुगाराचा खेळ सार्वजनिक ठिकाणी पैसे लावून खेळत असल्याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेलने छापा टाकून चार जणांविरूद्ध कारवाई केली आहे.
पनवेल जवळील विठ्ठलवाडी चिंचपाडा याठिकाणी काही इसम हे 52 पत्त्यांचा अंदर बाहर नावाचा जुगाराचा खेळ सार्वजनिक ठिकाणी पैसे लावून खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेलचे वपोनि गिरीधर गोरे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जी.व्ही. कराड, पोउपनिरीक्षक वैभव रोंगे, सपोनि शिवाजी हुलगे, पोहवा ज्ञानेश्वर वाघ व पथकाने
सदर ठिकाणी छापा टाकून चार जणांना रोख रकमेसह ताब्यात घेतले आहे व त्यांच्या विरूद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक आधिनियम 1887 चे कलम 12 अ प्रमाणे कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 41 = 44