आदिवासी ठाकुर समाज संघटना कर्जत तालुक्याच्या वतीने सिल्वर मेडल विजेती कु.अमृता ज्ञानेश्वर भगत हिचा सत्कार
कर्जत/ आदिवासी सम्राट :
आदिवासी ठाकुर समाज संघटना कर्जत तालुका नेहमीच तालुक्यातील विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणा-याना प्रोत्साहीत करण्यासाठी प्रयत्नशील असते. कर्जत तालुक्यातील विविध क्षेत्रात खेळाडू नेहमीच अग्रेसर असतात, जागतिक स्तरीय पॉवर लिफ्टिंग चॉपियन शिप 2023 रोमानिया येथे नुकतीस स्पर्धा झाली. या स्पर्धेत कर्जत तालुक्यातील शेलू येथील रहिवासी असलेली कु.अमृता ज्ञानेश्वर भगत हिने जागतिक पातळीवर तिचे व भारत देशाचे नाव लैकिक केले आहे. या झालेल्या स्पर्धेत कु. अमृता ज्ञानेश्वर भगत आपल्या भारत देशास सिल्वर मेडल प्राप्त करुन दिले आहे, त्यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कु.अमृता ज्ञानेश्वर भगत हिचे व तिच्या कुटूंबियांना आदिवासी ठाकुर समाज संघटना कर्जत तालुक्याच्या वतीने प्रोत्साहन मिळावे, म्हणून कु.अमृता ज्ञानेश्वर भगत हिचा व तिच्या आई वडील व भाऊ यांचा आभिनदंंन व सत्कार करण्यात आला, त्यावेळी आदिवासी ठाकुर समाज संघटना कर्जत तालुक्याचे अध्यक्ष श्री.परशुराम दरवडा, महिला अध्यक्षा व कर्जत पंचायत समिती मा.उपसभापती सौ.जयवंतीताई दत्तात्रेय हिंदोळा, शेलू ग्रा.पं.उपसरपंच बुधीताई दरवडा, शेलू ग्रा.पं.सदस्य अशोक वाघ, कर्जत तालुका संघटनेचे सहसचिव गणेश पारधी, संघटनेचे सल्लागार श्री.सुनील पारधी, दत्तात्रेय हिंदोळा, मनोहर दरवडा, सोमा निरगुड़ा, हिरू निरगुडा, संघटनेचे विभाग प्रमुख राजु पिरकड, मनोहर ढुमणा, नेरळ पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस भाऊ आघाण, संघटनेचे कार्यकर्ते शरद ठोंबरे, दिपक वाघ, गोमा निरगुड़ा, बबन शेंडे, परशुराम निरगुडा, हरीचद्र पारधी, रामा ठोंबरे व इतर संघटनेचे कार्यकर्ते उपस्थीत होते.