Img 20210714 Wa0061
अहमदनगर कोकण ठाणे ताज्या महाराष्ट्र सामाजिक

आदिवासी सेवा संघ, पुणे जिल्हाच्या वतीने आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंबाला मिळाला न्याय

आदिवासी सेवा संघ, पुणे जिल्हाच्या वतीने आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंबाला मिळाला न्याय

पारधी समाजावर झालेला अत्याचार, अन्यायांची तात्काळ चौकशी करण्याचे मा. पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना पुणे विभागीय उपायुक्त यांनी दिले आदेश

गोर गरीब आदिवासी समाजाची संघटना म्हणजे आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र – अनिल तिटकारे, पुणे जिल्हा अध्यक्ष

पुणे/ अविनाश मुंढे :
अहमदनगर नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामधील चिखलठाण येथे रहाणा-या आदिवासी पारधी समाजातील कुटुंबावर पोलीस कर्मचा-यांनी खोटे गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे त्या कुटुंबातील बीपीन चव्हाण व कलावंती चव्हाण यांना खुप मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. या कुटुंबातील सदस न्याय मिळण्यासाठी आदिवासी पारधी परिवर्तन संघटनेचे शरद पवार यांच्याकडे गेले. माञ, पुणे व अहमदनगर जिल्ह्यामध्ये आदिवासी सेवा संघाचे कार्य मोठे असल्याने आणि न्याय मिळेलच या आशाने आदिवासी पारधी परिवर्तन संघटनेचे शरद पवार यांनी पुणे जिल्हा अध्यक्ष अनिलभाऊ तिटकारे यांच्याकडे संपर्क साधावा.
त्यामुळे पुणे जिल्हा अध्यक्ष अनिलभाऊ तिटकारे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश मुंढे, पुणे जिल्हा सचिव अनिल पारधी व समाजातील कार्यकर्त्यांनी दि. १२ जुलै २०२१ रोजी पासून विभागिय कार्यालय विधान भवन पुणे येथे भर पाऊसात बेमुदत धरणे आंदोलन केले. आणि आदिवासी पारधी समाजावर अन्याय झाले त्यासंदर्भात निवेदन सुध्दा देण्यात आले. माञ, दोन दिवस आंदोलनाला होत आले तरी प्रशासनाने दखल घेतली नाही.
तसेच कार्यकर्त्यांचा हट्ट आणि न्याय मिळवून देऊ यांच भावना आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष अनिलभाऊ तिटकारे, उपाध्यक्ष अविनाश मुंढे, सचिव अनिल पारधी व आदिवासी पारधी परिवर्तन यांची भावना असल्यानेच अखेर दि. १४ जुलै २०२१ रोजी प्रशासनाने आदिवासी पारधी समाजातील कुटुंबावर झालेल्या अन्याय व अत्याचाराची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांना पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील श्री. संतोष पाटील, उपायुक्त (सामान्य प्रशासन) पुणे विभाग यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

57 + = 65