20230905_090533
नवीन पनवेल पनवेल मनोरंजन रायगड

पनवेल तालुक्यात डोळ्यांची साथ, काळजी घेण्याचे आवाहन

Adivasi samrat logo new website

पनवेल तालुक्यात डोळ्यांची साथ, काळजी घेण्याचे आवाहन

पनवेल/ आदिवासी सम्राट :
सध्या पनवेल तालुक्यात डोळ्यांची साथ पसरली आहे. जवळपास 40 ते 50 जणांना सध्या डोळ्यांची साथ आलेली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 
20230905_090618पनवेल तालुक्यात नेरे, वावंजे, गव्हाण, अजिवली, आपटा या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आजमीतीस जवळपास 200 जणांना डोळ्याची साथ पसरली आहे. यापैकी 156 रुग्ण बरे झाले तर 40 ते 45 शिल्लक रुग्ण आहेत. त्यामुळे नागरिकांनी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. डोळ्यांची साथ पसरल्यास नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, कारण इतरांचे डोळे येण्याची शक्यता असते. शाळेतील विद्यार्थ्यांचे देखील डोळे आलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरी राहावे, अन्यथा शाळेतील इतर विद्यार्थ्यामध्ये देखील ही साथ पसरू शकते. डोळ्याची साथ आली असल्यामुळे डोळे चोळू नये असे आवाहन डॉक्टर करत आहेत.

adivasi logo new 21 ok (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

59 − 56 =