मानवी जीवनात शाळे इतकेच वाचनालयाचे महत्त्व असावे
ग्रंथालयाकडे पाठ : मोबाईल मुळे वाचनसंस्कृती पावते लोप.
माथेरान/ चंद्रकांत सुतार :
वाचन करतात मात्र, वाचनाची पद्धत बदलत चाललीय व्हॉटअप, इंटरनेट ब्लॉग यांच्या माध्यमातून आजची तरुण पिढी स्वतःचे विचार व्यक्त, व वाचत आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे बघत आपले विचार मते व्यक्त करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे मूळ घटना काय आहे? हे न वाचताच विचार मत प्रवाह व्यक्त होताना दिसतो म्हणजे वाचन होताच नाही. काय वाचायचे, का? वाचायचे या प्रश्नात आजचे विद्यार्थी अडकले आहेत. स्पर्धेच्या युगात आपल्याला टिकून राहायचे असेल तर वाचन हे अत्यंत महत्वांचे आहे. आपणाला अनुभवाचे, न्यानाचे बोल, हे वाचनातून मिळत असते. त्याचा उपयोग आयुष्यात केला तर सर्व क्षेत्रात यशस्वी होता येते.
आयुष्यतला महत्वाचा काळ हा विद्यार्थी अवस्थेत असतो, त्या वेळी शिक्षणाचा अविभाज्य भाग म्हणजे वाचन, जो अभ्यासाबरोबर इतर पुस्तकांचे वाचन करतो तो विशेष प्राविण्य विविध क्षेत्रात करत असतो. शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावून भविष्यात उत्तम सुसंस्कृत नागरिक बनविणे यासाठी काही शाळेत योजना राबिवणे आवश्यक आहे. त्या मुळे वाचन, संस्कृती, संगोपन करणे वृद्धिंगत होईल. यासाठी विद्यार्थ्यांनसाठी वाचन संस्कृतीस असे विविध प्रकारचे कार्यक्रम, स्पर्धाचे आयोजन केले तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल, वाचनाची गोडी लागेल, त्या सोबत आपोआप घरातही ते वाचन संस्कृती वातावरण तयार होऊल, त्याचा फायदा सर्व कुटूंबाना त्याचबरोबर इतरांना होईल.
सध्याच्या मोबाईल युगात प्रत्येकजण एवढा व्यस्त झाला आहे की त्याला वाचनाची गोडी आणि आवड निर्माण होत नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून वाचकांच्या सेवेसाठी उपलब्ध असणाऱ्या नगरपरिषदेच्या एकमेव करसदास मुळजी वाचनालयाकडे कुणीही फिरकताना दिसत नाही. तर तरुण पिढी मोबाईल मध्ये व्यस्त असल्याने वर्तमानपत्र, विविध प्रकारची ज्ञानात भर घालणारी पुस्तके कुणीही वाचताना दिसत नाहीत. तर विशेष म्हणजे जेष्ठ नागरीक हीच मंडळी आवर्जून वर्तमानपत्र खरेदी करून वाचत आहेत. निसर्गाच्या सानिध्यात गावाच्या मध्यवर्ती भागात हे वाचनालय पूर्वापार सेवा उपलब्ध करून देत आहे. जवळपास १२००० मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेतील पुस्तके त्याचप्रमाणे मोठा ग्रंथ समूह वाचनासाठी उपलब्ध आहे. तर मागील काळात मुंबई येथील रहिवासी माथेरान प्रेमी प्रदीप पुरोहित यांनी विविध भाषेतील भगवद्गीता ग्रंथ देणगी स्वरूपात दिलेले आहेत.
या भव्य वाचनालयात जेमतेम वीस सभासद असून चार ते पाच वाचक नियमितपणे येत असतात यामध्ये अमोल चौगुले हे नित्याचेच वाचक आहेत. परंतु सध्याची पिढी ही मोबाईलच्या अधीन गेल्यामुळे वाचनसंस्कृती जवळजवळ लोप पावत चालली आहे.
——————————
वाचनाची आवड प्रत्येक विद्यार्थ्यांना निर्माण झाली पाहिजे त्यासाठी शिक्षकांनी आठवड्यातुन एक दिवस तरी मुलांना या वाचनालयात नेऊन त्यांना वर्तमानपत्र तसेच विविध ज्ञानार्जनाची पुस्तके, ग्रंथ हे वाचण्यासाठी दिल्यास नक्कीच भावी पिढीला याचा मोठया प्रमाणावर फायदा होऊन मुलांच्या बौद्धिक ज्ञानात तसेच जनरल नॉलेज मध्ये भर पडणार आहे. याबाबत शिक्षकांशी चर्चा करणार आहोत.
– प्रेरणा सावंत,
नगराध्यक्षा, माथेरान
————– ————–