IMG-20201222-WA0008
कर्जत ताज्या महाराष्ट्र रायगड सामाजिक

कर्जत तालुका ठाकूर नोकरदार संघटनेकडून बोगसांची घुसखोरी रोखण्यासाठी उपाययोजना…. बोगस आदिवासींच्या विरोधात लढण्यासाठी आर्थिक पंड जमा करा – उत्तम डोके

कर्जत तालुका ठाकूर नोकरदार संघटनेकडून बोगसांची घुसखोरी रोखण्यासाठी उपाययोजना

बोगस आदिवासींच्या विरोधात लढण्यासाठी आर्थिक पंड जमा करा – उत्तम डोके

कर्जत/ प्रतिनिधी:
कशेळे येथे रविवार (दि. २० डिसेंबर) रोजी कर्जत तालुका नोकरदार संघटनेकडून आदिवासी मध्ये होत असलेल्या बोगस खुसखोरी संदर्भात कशेळे येथील भवानी मंदिरामध्ये कर्जत तालुक्यातील नोकरदार वर्ग कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांची संयुक्तपणे मिटिंग घेण्यात आली.
बोगस खुसखोरी संदर्भातील मिटिंगमध्ये बोगसांना रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील ठाकूर नोकरदार आदिवासी एकत्र येत असून बोगसांनी अनेक वर्षापासून आपल्या आदिवासी मध्ये खुसखोरी करून आपल्या खऱ्या आदिवासींना अनेक क्षेत्रातील नोकऱ्या, लाभापासून वंचित राहावण्यास भाग पाडले आहे. म्हणून आता बोगसांविरुद्ध कोर्ट केसेस, न्यायालयीन लढाई लढून अनेक बोगसांना खुसखोरी करण्यापासून रोखण्यात महाराष्ट्र राज्य ठाकूर नोकरदार संघटनेला यश आले आहे. यामुळे बोगासाविरुद्ध यापुढे अधिक आक्रमक पणे एकजुटीने लढण्यासाठी अधिकचा लढा निधी जमा करावा तसेच प्रत्येक जातपडताळणी समिती कार्यालयात वेळोवेळी जाऊन जात वैधता प्रमाणपत्रासाठी आलेल्या केसेसची माहिती घेऊन बोगस वाटल्यास त्याच्या विरूदध नोकरदार संघटनेच्या वतीने हेटिंगच्या वेळी वकिलासह उपस्थित राहून बोगसांना आदिवासीचे जात वैधता प्रमाणपत्र घेण्यापासून रोखण्यासाठी समिती स्थापन करणे. समाजातील सुशिक्षित तरूणाकडे असलेल्या बुद्धीमत्तेचा वापर स्तुत्य समाज कार्यासाठी व्हावा म्हणून अशा सुशिक्षित तरुणांना बोगसासंदर्भात लढण्यासाठी विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्यात. तसेच तालुक्यातील प्रत्येक नोकरदारांने, सामाजिक कार्यक्रत्याने बोगसा विरूदध लढा निधी देऊन ठाकूर नोकरदार संघटनेच्या सामाजिक कार्याला हातभार लावावा म्हणून तालुका नोकरदार संघटनेच्या खात्यावर आपल्या इच्छेप्रमाणे बोगस विरूद्धच्या कोर्ट केसेससाठी सहकार्य करावे, म्हणून बँकेत खाते खोलणे अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयाची सविस्तर चर्चा नोकरदार वर्गाच्या कशेळे येथील मिटिंगमध्ये करण्यात आली.
या मिटिंगसाठी ठाकूर नोकरदार संघटना खजिनदार गणेश पारधी, सहसचिव उत्तम डोके, कर्जत तालुका ठाकूर नोकरदार संघटना अध्यक्ष दत्तात्रय हिंदोळे, उपाध्यक्ष लक्ष्मण पादीर, संघटनेचे अध्यक्ष भरत शिद, सदस्य काशिनाथ पादीर, उपाध्यक्ष गजानन भला, विजय बांगारे, नामदेव काबंडी, लहू ढोले, कवी पारधी, लक्ष्मण पादीर, दशरथ पारधी, बाळू भगत, मनोहर दरवडा, बबन निरगुडा, दशरथ निरगुडा आदि. प्रमुख कर्जत तालुका नोकरदार वर्गासह,ठाकूर समाज संघटनेचे अनेक पदाधिकारी नोकरदार, सामाजिक कार्यक्रतेे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 + 2 =