शिव प्रतिष्ठानतर्फे आदिवासी बांधवांना फराळ व सुगंधी उटनेचे वाटप
उरण/ प्रतिनिधी :
आर्थिक परिस्थिति बेताची असलेल्या व विकासापासून लाखो कोस दूर असलेल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळणारा कातकरी आदिवासी समाज दिवाळी सारख्या पवित्र व मोठ्या आनंदाच्या सणापासून लांबच राहत आलेले आहेत. त्यांच्या सुखः दुःखात सहभागी होण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांचा आनंद द्विगुणित करण्याच्या उद्देशाने शिवप्रतिष्ठान या राज्यस्तरीय संघटनेच्या उरण तालुक्याच्या वतीने पनवेल तालुक्यातील बारपाडा-कल्ले गाव येथील लहुची वाडी या आदिवासी वाडिवर तसेच चिरनेर मार्गावर माकडडोरा येथे आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ व सोबत सुगंधी उटनेचे वाटप करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवाजी महाराजांच्या विचार व कार्याचा प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने शिवप्रतिष्ठान या सामाजिक संघटनेतर्फे वर्षभर समाजात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून शिव प्रतिष्ठान उरण तालुक्याच्या वतीने डोंगर द-यामध्ये, रानावनात राहणाऱ्या शेतीकाम व मोलमजूरी करून आपली उपजीविका करणाऱ्या आदिवासींना फराळ व आंघोळीच्या उटने पावडरचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवप्रतिष्ठान उरण तालुक्याचे अध्यक्ष सुदेश पाटिल, हेमंत पवार, प्रेम म्हात्रे, ओमकार म्हात्रे, हेमंत म्हात्रे, सूरज पवार, गिरिधर गाताडी, दर्शन जोशी, हेमंत कोळी, शिवप्रतिष्ठानचे सदस्य तथा उरण तालुका प्रसिद्धि प्रमुख विठ्ठल ममताबादे आदी. शिवप्रतिष्ठान संघटनेचे दाधिकारी कार्यकर्ते, सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, शिक्षक निवास गावंड आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर उपक्रमामुळे आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.