ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

प्रांताच्या विरोधात काढला वकील संघटनेने मोर्चा

प्रांताच्या विरोधात काढला वकील संघटनेने मोर्चा

पनवेलमध्ये वकील संघटना विरुद्ध उपविभागीय अधिकारी आमने-सामने

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल वकिल संघटनेच्या सभासदांनी एकत्र येऊन सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास पनवेल कोर्टाच्या नुतन इमारतीमध्ये जमा होवुन उपविभागिय अधिकारी पनवेल यांच्या कार्यालयावर शांततेत मोर्चा काढला. सदरचा मोर्चा पोलिसांनी उपविभागिय अधिकारी पनवेल यांच्या कार्यालयाच्या अगोदरच आडवला. यावेळी पनवेल वकिल संघटनेच्या शिष्ट मंडळाने उपविभागिय अधिकारी पनवेल यांना निवेदन दिले. यावेळी पनवेल वकिल संघटनेचे अध्यक्ष मनोज कृ. भुजबळ, उपाध्यक्ष संदिप रमाकांत जगे, सचिव प्रल्हाद खोपकर, खजिनदार संतोष म्हात्रे संचालक मंडळाचे सदस्य शैलेश नाईक, संतोष मनोहर लाड व इतर सदस्यांनी उपविभागिय अधिकारी पनवेल यांची भेट घेतली. मुळातच हा मोर्चा पनवेल प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांच्या विरोधातील असल्यामुळे पनवेलमध्ये वकील संघटना आणि उपविभागीय अधिकारी आता आमने सामने आलेले पाहायला मिळत आहेत.
याबाबत मुळातच घडलेल्या घटनेचा आढावा घेतला असता वकील संघटनेकडून समोर आलेली बाब म्हणजे, उपविभागिय अधिकारी पनवेल यांच्याकडे कार्यरत असलेले क्लार्क प्रसाद पाटील यांच्या आरेरावीबाबत देखील वकील संघटनेने दिलेल्या निवेदनात नाराजी व्यक्त केली होती. प्रसाद पाटील यांनी दि. 07/11/2019 रोजी एस.डी.ओ. कोर्ट ग्रुप या नावाने हॉट्सअ‍ॅप वर 07/11/2019 चा दैंनदिन बोर्ड टाकुन त्यामध्ये अ. क्र. 8 कडे तक्रारदार सुधीर जोशी व सामनेवाले संतोष मनोहर लाड असा मजकुर जाणिवपुर्वक छापल्याचे निदर्शनास आणुन दिले. लाड वकीलांच्या विरूध्द उपविभागिय अधिकारी पनवेल यांनी दि. 13/09/2019 रोजी काढलेली बेकायदेशिर नोटीस जिल्हाधिकारी रायगड यांनी दि. 21/09/2019 च्या आदेशाने रद्द केल्यावर देखील दि. 07/11/2019 च्या उपविभागिय अधिकारी पनवेल यांच्या दैनंदिन बोर्डवर अ.क्र. 8 कडे अशा प्रकारे नोंद करणे लाड वकिलांची बदनामी करण्याचे असल्याचे सर्वांचे मत झाले. यावेळी प्रसाद पाटील यांनी तेवढयावर न थांबता पुन्हा दि.14/11/2019 रोजी प्रमोद ठाकुर वकिलांनी पनवेल वकिल संघटेच्या पदाधिकार्‍यांना दि.12/11/2019 रोजी दिलेल्या कथीत नोटीशीची स्कॅन केलेली प्रत पनवेल एस.डीओ. कोर्ट या हॉट्सअ‍ॅपच्या ग्रुपवर जाणीपर्वक टाकली, त्याबद्दल वकिल संघटनेकडुन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. उपविभागिय अधिकारी पनवेल यांच्या मनमानी कार्यपध्दतीबाबत फक्त लाड वकीलांचाच आक्षेप नसुन वकील संघटनेकडे अनेक वकीलांनी तोंडी तक्रारी केल्या असल्याचे देखील पनवेल वकिल संघटनेच्या शिष्ट मंडळाने उपविभागिय अधिकारी पनवेल यांच्या निदर्शनास आणुन दिले.
एकंदरीतच उपविभागिय अधिकारी पनवेल यांचा कारभार मनमानी असल्याचा ठराव 06/11/2019 रोजी केला होता. यावेळी पनवेल उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यानुसार पनवेल वकील संघटनेने याबाबत संबंधित यंत्रणेला तशा आशयाची निवेदने देऊन उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मनमानीला आळा घालण्यासह त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामध्ये वकील संघटनेने जिल्हाधिकारी रायगड अलिबाग, विभागीय आयुक्त कोकण विभाग मुंबई, महसुल मंत्री महाराष्ट्र राज्य व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्याकडे लेखी तक्रार वजा निवेदन दाखल केलेले असून त्या अनुषंगाने पनवेल वकिल संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी 14 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी रायगड, यांची प्रत्यक्ष भेट घेवुन उपविभागिय अधिकारी पनवेल दत्तु नवले यांच्यावर कठोर कारवाई करणेबाबत तसेच त्यांच्याकडील कामे काढुन घेण्याबाबत विनंती केली आहे. सोमवारी काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये पनवेलमधील वकील संघटनेच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदवून सर्वसामान्य जनतेला पिळवणूक करणाऱ्यांविरोधात आवाज उठविला आहे.
याबाबत पनवेल प्रांत अधिकारी यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क केला असता संपर्क झाला नाही. पण या मोर्चानंतर तालुक्यातील जनतेतून वकील संघटनेचे कौतुक होत आहे.

One thought on “प्रांताच्या विरोधात काढला वकील संघटनेने मोर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 3 = 5