नैना विरोधी सुकापुर बंद आंदोलनाला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद
पनवेल / प्रतिनिधी :
12 फेब्रुवारी रविवार सुकापुर ग्रामस्थ आणि नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने छेडण्यात आलेल्या सुकापुर गाव बंद आंदोलनाला नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, रिक्षाचालक, टेम्पोचालक बांधवांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेली बहुतांशी दुकाने आणि अन्य व्यावसायिक धंदे बंद ठेवण्यात आले होते. नागरिकानी १००% सुकापुर बंद करून नैना प्राधिकरणाचा निषेध व्यक्त केला.
यावेळेस माजी आमदार बाळाराम पाटील यांनी मार्गदर्शन करताना कोणत्याही स्वरूपात शेतकरी बांधवांवर येथील फ्लॅटधारकावर अन्याय होऊ देणार नाही ही भूमिका मांडली. नैना प्रशासन मोफत 60 टक्के जमीन घेऊन शेतकरी बांधवांवर जो अन्याय करतोय ही दडपशाही सहन केली जाणार नाही आणि शेवटच्या घटकाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष चालू राहील अशा पद्धतीचा संदेश बाळाराम पाटील यांच्या वतीने देण्यात आला. राजेश केणी यांनी आपल्या मनोगतामध्ये सुकापुरच्या पुनर्विकासाचा मुद्दा ठळकपणाने घेतला.
नैनाच्या उदासीन धोरणामुळे लोकांचे बळी जायची वेळ आली आणि आज जरी आम्ही शांतता मार्गाने गाव बंद केला असेल तरी पुढील काळामध्ये आम्ही लढायचं स्वरूप बदलायला मागेपुढे राहणार नाही ही भूमिका मांडली. अनिल ढवले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सुकापुर ही तर सुरुवात आहे, पनवेल तालुक्यातील नैनाना प्रकल्प बाधित सर्व गाव, नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशारा दिला. अध्यक्ष वामन शेळके यांनी सुद्धा संपूर्ण पनवेल तालुका या लढ्यामध्ये सहभागी असल्याचे सांगितले. सुकापुर बंद आंदोलनात आमदार बाळाराम पाटील, तालुका चिटणीस राजेश केणी, वामन शेळके, अनिल ढवळे, शेखर शेळके, सिताराम म्हसकर, पांडुरंग सिताराम केणी, पांडुरंग सखाराम केणी, जनार्दन पाटील, अशोक पाटील, कमलाकर केनी, परशुराम पाटील, प्रभाकर केनी, पंढरीनाथ म्हसकर, चंद्रकांत पोपटा, किशोर म्हसकर, मनोहर केणी, श्रीराम केणी, जयेंद्र केणी, आत्माराम पाटील, जगन्नाथ बेळे, जयवंत बेर्डे, संजय केणी, रमेश केणी, दत्तात्रय केणी, अक्षय केणी, नंदू कुराडे, दिवाकर पाटील, एडवोकेट सुरेश ठाकूर, जगदीश वाघमारे, पांडुरंग वाघमारे, सुदाम वाघमारे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.