20200330_221216
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक

बियरच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्यांवर नाकाबंदी दरम्यान कारवाई! पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; 3 लाख रुपयाच्या कारसह 6 हजारांची बियर जप्त

बियरच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्यांवर नाकाबंदी दरम्यान कारवाई

पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; 3 लाख रुपयाच्या कारसह 6 हजारांची बियर जप्त

पनवेल/ राज भंडारी :
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी सुरु झाली असून वाहनांच्या तपासणी करण्यात आल्या आहेत. या दरम्यान पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पळस्पे फाटा येथे नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करीत असताना एका कारमध्ये तब्बल 6 हजार रुपयांच्या बियरसह इतर वस्तू मिळून आल्या. यावेळी कारवाई करीत असताना सदरचे 3 लाख रुपये किमतीची कार जप्त करून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव जगभर पसरत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारसह पोलिसांनी सर्वच नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि आवाहन केले होते. मात्र नागरिक कोरोना व्हायरसबाबत गांभीर्याने पाहत नसल्यामुळे प्रशासनाला पुढील अनर्थ टाळण्यासाठी कठोर कारवाई करावी लागत आहे. यामध्ये सोमवारपासून कडक अंमलबजावणी करण्यात आल्यानंतर वाहन तपासणीसह मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी पळस्पे नाकाबंदी चेक पोस्ट, पनवेल या ठिकाणी हुंडाई एसेंट कार क्र. MH-03/ CH-2827 या गाडीतून शागिर छोटू खान, वय-२९, रा.- लोटस काॅलनी, गोवंडी, मुंबई, शिवा हनुमंता गुडपास, वय-२२, रा.- सवेरा सोसायटी, कुर्ला (पूर्व), मुंबई
आणि उबेद शकुर शेख, वय-२४, रा.- वर्षा आदर्शनगर, कुर्ला (पूर्व), मुंबई यांना किंगफिशर बियरच्या ३५ बाटल्यासह पकडण्यात आल्यानंतर त्यांचेविरूद्ध पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा. रजि. नंबर 166 / 2020 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ) सह भादंवि कलम 188 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावेळी या कारमधून 5775/- किंमतीची बियर व 3,00,000/- ची कार जप्त करण्यात आली आहे. आरोपींना CrPC 41 (1) अ प्रमाणे नोटीस देवून सोडण्यात आले आहे.

One thought on “बियरच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्यांवर नाकाबंदी दरम्यान कारवाई! पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; 3 लाख रुपयाच्या कारसह 6 हजारांची बियर जप्त

 1. ->>>>>>>>>>>>>как приворожить жену самому<<<<<<<<<-
  ______________приворот на мужчину степановой _____________

  https://privorot4.wordpress.com

  заговор на любовь мужчины по фото читать, а также:

  ->>>>>>вуду приворот на любовь мужчины читать
  ->>>>>>как к себе привязать парня
  ->>>>>>как вернуть любимого мужчину после расставания заговор белая магия
  ->>>>>>заговор на лист бумаги

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

79 + = 89