अलिबाग ताज्या रायगड सामाजिक

बेरोजगार युवक-युवतींनी तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांनी “मैत्री” या सहाय्यता कक्षाचा लाभ घ्यावा

बेरोजगार युवक-युवतींनी तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम
उपक्रमांनी “मैत्री” या सहाय्यता कक्षाचा लाभ घ्यावा

अलिबाग/ जिमाका : 
महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात मार्च 2020 पासून कोविड-19 या संसर्गजन्य विषाणूचा प्रादूर्भाव झाल्याने दि. 23  मार्च 2020 पासून राज्यामध्ये लॉकडाऊन सुरु आहे.  त्यानंतर राज्यातील ग्रामीण भागामध्ये उद्योग सुरु करण्यास राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे.  केंद्र शासनाने नुकतेच सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमासाठी पॅकेज जाहीर केले आहे.
या पॅकेज अंतर्गत विविध लाभ घेण्यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांना  बळ देणे आवश्यक आहे.
लॉकडाऊन कालावधीदरम्यान व त्यानंतर सुध्दा बऱ्याच सूक्ष्म व मध्यम औद्योगिक उपक्रमांना तसेच सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज मिळण्यासाठी अडचणी, GST परताव्या संदर्भात, सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रमाने पुरवठा केलेल्या वस्तू पोटी राज्य शासनाच्या विविध विभागाकडून व सार्वजनिक उपक्रमांकडून प्राप्त व्हावयाच्या रकमेसाठी सहाय्य करणे, तसेच उद्योग  उपक्रम स्थापन करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी मैत्री कार्यालयामध्ये दि.15 मे 2020 पासून हेल्प डेस्क (सहाय्यता कक्ष ) स्थापन करण्यात आला आहे.

…………………………………..
मैत्री कार्यालयाचा पत्ता पुढीलप्रमाणे- अध्यक्ष, मैत्री कक्ष, कृपा निधी बिल्डींग, पहिला मजला, 09 वालचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड पियर, फोर्ट, मुंबई-400 038 (दूरध्वनी क्रमांक 022-22622361/22622322) ई-मेल-maitri-mh@gov.in, वेबसाईट :-www.maitri.mahaonline.gov.in/www.di.maharashtra.gov.in असा आहे.
बेरोजगार युवक, युवतींनी तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांनी या सहाय्यता कक्षाचा लाभ घ्यावा,  असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे  महाव्यवस्थापक संदिप पाटील यांनी केले आहे.

One thought on “बेरोजगार युवक-युवतींनी तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांनी “मैत्री” या सहाय्यता कक्षाचा लाभ घ्यावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 1 = 9