IMG-20191008-WA0019
अलिबाग कर्जत कोकण ठाणे ठाणे नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई सामाजिक

तेलंगवाडी मध्ये वनअधिकाऱ्यांची मनमानी प्रकरण तापले….. पोलिसांनी कारवाई न केल्यास आदिवासी आत्मदहन करणार

तेलंगवाडी मध्ये वनअधिकाऱ्यांची मनमानी प्रकरण तापले…..

 • पोलिसांनी कारवाई न केल्यास आदिवासी आत्मदहन करणार
 • कर्जत तालुका आदिवासी ठाकूर, कातकरी विकास संघटना आक्रमक
 • आदिवासी समाज सेवा मंडळाच्या वतीने मनोहर पादीर यांनी वनविभागाच्या अधिका-यांवर गुन्हे दाखल होण्यासाठी कर्जत तालुकासह जिल्हाभर वनविभाग, महसूल विभाग व पोलीस विभागाला दिले पञ.
 • या प्रकरणाची चौकशी करा व आदिवासींना न्याय मिळवून द्या! अन्यथा महाराष्ट्र राज्यभर आंदोलन करण्याचा दिला इशारा
  — संजय गुरव, श्रमजीवी संघटना रायगड जिल्हा सचिव, महाराष्ट्र.
 • विविध संस्था व संघटनांच्या पदाधिका-यांची चर्चा करून ‘एकाच दिवशी – एकाच वेळी’ मोठे आंदोलन करण्याचे नियोजनाच्या तयारीत
  — पञकार, गणपत वारगडा,
  आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र.
 • जो पर्यंत समाजाला न्याय मिळत नाही तो पर्यंत समाजाच्या बरोबर
  — बी. पी. लांडगे, सचिव आदिवासी विकास परिषद.
 • सामाजिक कार्यकर्त्यां कविता निरगुडे यांनी आपले सरकारवर तक्रार करून प्रशासनाकडे समाजातील व्यथा मांडली.
 • अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर, कर्जत, पनवेल, पेण, सुधागड- पाली, खालापूर तालुक्यातील आदिवासी कार्यकर्ते आक्रमक होवून वनविभागाचा केला निषेध.

………………………………….
कर्जत तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायत मधील तेलंगवाडी येथील शेतकरी असलेल्या आदिवासी लोकांच्या  वडिलोपार्जित भात शेतीवर  वनविभाग आणि स्थानिक पोलिस अधिकारी यांनी यापूर्वी कोणतीही तोंडी – लेखी पूर्व सुचना न देता शेतातील तयार झालेले पीक कापून टाकले. भाताचे तसेच भाजीपाला शेती जमिनीत जाऊन उपटून टाकत, मशीनद्वारे कापून टाकत असताना संबधित गावातले आपले आदिवासी शेतकरी बांधव सांगण्यास गेले असता संबधित अधिकाऱ्यांनी आपल्या आदिवासी महिलांना धक्काबुकी, मारहाण, जातीवाचक अपशब्द वापरून, गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. या प्रकाराने आदिवासी समाज एकवटला असून त्यांनी जोरदार आवाज उठविला आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरुद्ध अट्रोसिटी ऍक्ट खाली गुन्हे नोंदविण्याची मागणी असून ती पूर्ण न झाल्यास ते शेतकरी आत्मदहन आंदोलन करणार असल्याचे सांगितले जाते.
………………………………

कर्जत/ प्रतिनिधी :
कर्जत येथील वरील प्रकाराची माहिती कळताच आदिवासी ठाकूर कातकरी विकास संघटना व अन्य कार्यकर्त्यांच्या वतीने मॅसेज द्वारे सर्व आदिवासी  ग्रुपवर मॅसेज/माहिती टाकून तात्काळ तेलंगवाडी येथील जागेवर जमण्याचे आव्हान केले होते. त्यानुसार हजारो आदिवासी एकत्र आले. कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी विकास संघटना, कर्जत तालुका आदिवासी महादेव कोळी संघटना, मुरबाड तालुका आदिवासी संघटना, अंबरनाथ तालुका आदिवासी संघटना, आणि आजूबाजूच्या इतर तालुक्यातून मोठया संख्येने आलेल्या समाज बांधवांच्या समवेत संबंधित शेतकऱ्यांची – गावकऱ्यांची विचारपुस करून सर्वांनी नेरळ पोलीस ठाणे गाठण्याचा निर्णय घेतला. तेथे पोहचल्यानंतर संबधित कारवाई शेतकऱ्यांना अंधारात ठेवून करणारे वन अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांच्यावर अॅट्रोसिटी ऍक्ट खाली गुन्हा  दाखल व्हावा तसेच संबधितांवर कारवाई व्हावी यासाठी सर्वांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
वडिलोपार्जित जमिनीवर उभे असलेले भाताचे पीक आणि भाजीपाला यांच्यावर मशीन फिरविणा-या अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही न झाल्यास सर्व आदिवासी आंदोलनाचा पवित्रा अवलंबणार आहेत. विविध संघटना मिळून पिडीत तेलंगवाडी – भोपळीचीवाडी येथील आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी मोर्चा- आंदोलन- रास्तारोको- घेराव- उपोषण करणार असल्याचे आदिवासी बांधवांना न्याय देण्याचा निर्णय सर्वांनी घेतला आहे. तेलंगवाडीतील असंख्य ग्रामस्थासह प्रामुख्याने कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी विकास संघटनेचे अध्यक्ष भरत शिद, उपाध्यक्ष मंगळ केवारी, आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दादा पादिर, खजिनदार बुधाजी हिंदोळा, माजी अध्यक्ष जैतू पारधी, उपाध्यक्ष परशुराम दरवडा, सहखजिनदार अर्जुन केवारी, सहसचिव दत्तात्रय हिंदोळा सर, आदींनी हा निर्णय घेतला आहे.

……………………………….
आदिवासी समाजावर हा प्रसंग ओढवल्याने तेलंगवाडी आदिवासी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर पादीर यांनी तालुका व जिल्हाभर वनविभाग, महसूल विभाग व पोलीस विभागाला पञ देवून वनविभागाच्या अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तर श्रमजीवी संघटनेचे रायगड जिल्हा सचिव संजय गुरव यांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून संबंधित या प्रकरणाची चौकशी करा व आदिवासींना न्याय मिळवून द्या! अन्यथा महाराष्ट्र राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच आदिवासी विकास परिषदेचे सचिव बी. पी. लांडगे जो पर्यंत समाजाला न्याय मिळत नाही तो पर्यंत समाजाच्या बरोबर असल्याचे सांगितले आहे. एवढंच नाही तर आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष तथा पञकार गणपत वारगडा हे सुद्धा आक्रमक झाले असून ‘एकाच दिवशी – एकाच वेळी’ मोठा आंदोलन करण्याच्या तयारीत असून समाजातील विविध संस्था व संघटनांच्या पदाधिका-यांची चर्चा करून नियोजन आखण्याच्या तयारीत आहेत.
या बरोबरच कर्जत तालुका महादेव कोळी संघटना आणि अंबरनाथ तसेच मुरबाड तालुका आदिवासी संघटना कर्जत तालुक्यात धावून आल्याचे दिसून आले. संघटनेचे पदाधिकारी कृष्णा कोकाटे, लक्ष्मण लोहकरे तसेच मुरबाड तालुका पदाधिकारी हनुमान पोकळा, दिगंबर वाघ, गुरूनाथ कातवारा, यांच्यासह शेजारच्या अंबरनाथ तालुका आदिवासी संघाने देखील या घटनेचा निषेध करीत कर्जतला धाव घेतली. त्यात बदलापूर- अंबरनाथ येथील श्रीराम मोंढाळे, रामदास शिंगवे, साई आघाण, चेतन बांगारे यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. तर सामाजिक कार्यकर्त्यां कविता निरगुडे यांनी आपले सरकारवर तक्रार करून प्रशासनाकडे समाजातील व्यथा मांडली असल्याने कळले जाते. ही सर्व परिस्थिती पहावून आता प्रशासन वनविभागाच्या अधिका-यांवर काय? कारवाई करणार याकडे आदिवासी समाजाचे लक्ष लागून राहिले आहे.
…………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 + 2 =