Niranjan Davkhare
अलिबाग ताज्या महाराष्ट्र रायगड सामाजिक

आमदार निरंजन डावखरे यांच्या वतीने पोलीस भरती ऑनलाईन मोफत मार्गदर्शन 

आमदार निरंजन डावखरे यांच्या वतीने पोलीस भरती ऑनलाईन मोफत मार्गदर्शन 

अलिबाग/ प्रतिनिधी :
महाराष्ट्रात लवकरच मोठी पोलीस भरती होणार असून, या भरती प्रक्रिया विषयक मार्गदर्शन व्हावे, प्रत्येक बारकावे समजून घ्यावेत, यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पहिल्यांदाच पोलीस भरती ऑनलाइन (फेसबुक लाईव्ह) मार्गदर्शनपर संवाद कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर पोलीस भरती मार्गदर्शन गुरुवारी 16 जुलै रोजी सांयकाळी 7 वाजता /NiranjanDavkhare या फेसबुक पेजवरून होणार आहे. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन बारामती येथील सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक व पोलीस भरती पुस्तकांचे लेखक उमेश रुपनवर करणार आहेत.
या मार्गदर्शनपर कार्यक्रमात पोलीस भरतीचे बदललेले निकष व पात्रता, पोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, आरक्षण, पोलीस भरतीसाठी अचूक जिल्हा निवड,पोलीस भरतीचे नवीन जीआर, मैदानी चाचणी व लेखी परीक्षा यामधील बदल व बारकावे या सर्व घटकांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. एकंदरीत बदललेल्या पोलीस भरती प्रक्रियेला सामोरे जाऊन यशस्वी व्हावे, याचा कानमंत्र ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमात दिला जाणार आहे. तरी इच्छुक मुला-मुलींनी व त्यांच्या पालकांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक निरंजन वसंत डावखरे यांनी केले आहे.