Img 20200306 Wa0012
ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र रायगड सामाजिक

NRC, NPR, CAA ला विरोध करणा-या बहुजन क्रांती मोर्चाच्या भारत बंद आंदोलनास आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्राचा जाहिर पाठिंबा

NRC, NPR, CAA ला विरोध करणा-या बहुजन क्रांती मोर्चाच्या भारत बंद आंदोलनास आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्राचा जाहिर पाठिंबा

पनवेल/ प्रतिनिधी :
बहुजन क्रांती मोर्चा चा NRC, NPR, CAA कायद्याला विरोध करण्यासाठी ४ मार्च रोजी संपूर्ण देशभरात भारत बंदचा आवाहन केले होते. या बहुजन क्रांती मोर्चाच्या भारत बंद आंदोलनास देशभरात अनेक तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात देखील बहुजन क्रांती मोर्चाच्या आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळाले असून यावेळी NRC, NPR, CAA ला विरोध करणा-या बहुजन क्रांती मोर्चाच्या भारत बंद आंदोलनास आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने पञकार गणपत वारगडा यांनी जाहिर पाठिंबा दिला.

त्यावेळी आदिवासी सेवा संघाचे वावंजे विभागीय अध्यक्ष, वावंजे ग्रामपंचायतीचे सदस्य अरूण कातकरी तसेच बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.